सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मयत खातेदाराच्या वारसाला विमा मंजूर
आटपाडी प्रतिनिधी
शेटफळे ता. आटपाडी येथील रखमाजी महादेव कोळेकर यांचे अपघाती निधन झाले होते. तर ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शेटफळे येथील खातेदार होते.
रखमाजी महादेव कोळेकर हे प्राथमिक शिक्षक होते .शेटफळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये कार्यरत होते. मनमिळावू स्वभावाचे, विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून काम करणारे शिक्षक होते ,विद्यार्थी प्रिय होते .जिल्हा परिषद मध्ये आदर्श शाळेमध्ये त्यांच्या कामाची दखल घेऊन दुसरा क्रमांक मिळाला होता या शाळेमध्ये एकूण 165 पट आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शेटफळे या शाखेत खतेदर होते .त्यांचा 1, मे रोजी चारचाकितून जात असताना अपघाती मृत्यू झालेने पगारदार नोकर विमा प्रीमियर रक्कम 354 रु वार्षिक हफ्ता नुसार त्यांचा वारसास रक्कम 20 लाख रुपये मंजुर झाले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, संचालक तानाजीराव पाटील, संचालक विशाल पाटील संचालक वैभव शिंदे यांच्या हस्ते विमा मंजुरीचे पत्र मयत रखमाजी कोळेकर यांच्या कुटुंबियांना देण्यात आले.
फोटो – विमा मंजुरीचे पत्र देताना चेअरमन मानसिंगराव नाईक,संचालक तानाजी पाटील व मान्यवर







