महा किड्स मध्ये महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव नातेपुते
प्रतिनीधी:
नातेपुते येथील महा किड्स स्कूल मध्ये विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती, पत्रकार दिन, आणि सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल ऑल जुर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल चे उपाध्यक्ष .श्रीकांत बाविस्कर होते. तसेच एबी आठवले, विलास भोसले आणि राजुभाई नदाफ उपस्थित होते! संस्थेचे अध्यक्ष .शिवशंकर पांढरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषण केले! यावेळी महा किड्स मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची सुमारे 50 पुस्तकांचे प्रमुख पाहुणे व विद्यार्थी यांच्यासाठी प्रदर्शन मांडण्यात आले होते!
प्रमुख पाहुण्यांनी संघर्ष हा समृध्दीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे असा संदेश दिला. पूर्व प्राथमिक गटातून स्वामी विवेकानंद वेशभूष प्रथम क्रमांक असद फय्याज मुलांनी, द्वितीय अर्जुन पवार, सावित्रीबाई फुले वेशभूषा प्रथम क्रमांक नम्रता गणेश पवार प राजमाता जिजाऊ वेशभूषा प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक आर्या राजेंद्र मुंजी, पत्रकार वेशभूषा द्वितीय वेदांत राजेंद्र वाघमोडे, तृतीय आरोही सतिश झंजे यांना देण्यात आला! पूर्व प्राथमिक भाषण प्रथम विकास नामदेव पवार, द्वितीय असद फय्याज मुलानी, तृतीय संस्कार अजिनात कदम, प्राथमिक गट प्रथम आरुष सुशील गांधी द्वितीय आर्या राजेंद्र मुंजी, तृतीय कार्तिक सुरेश राऊत यांना देण्यात आला! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर काळे सर यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोमल मिस, पुनम मिस, साधना मिस यांनी परिश्रम घेतले.







