आटपाडी तालुक्यात वृक्ष लागवड जोमात पण पाण्याअभावी वृक्ष कोमात
रोपे सुकली ,खड्डे चुकवुन रोपे लावली अनेक रूपे जळाली
घरनिकी ता. आटपाडी येथे वन विभागामार्फत 5,500 रोपांची लागवड केली होती. रोपांची लागवड केल्यापासून त्या रोपांना पाणी घालण्यात आले नाही .त्यामुळे रोपे सुकू लागलेली आहेत. व काही रोपे पाण्याअभावी जळाली आहेत.
शासनाकडून खड्डे पाडणे, त्या रोपांचे तीन वर्ष संगोपन करणे, रोपांना पाणी घालण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे .परंतु हा खर्च सगळा वायफळ जात आहे.
वृक्ष लागवड केल्यापासून त्या रोपांना अद्याप पाणी दिलेले नाही. सध्या उन्हाचे दिवस आहेत . तरी सुध्दा रोपांना पाणी नाही. त्यामुळे अनेक रूपे जळाली आहेत. रोपांना पाणी घालण्यासाठी शासन करोड रुपये देत आहे तरीसुद्धा अधिकारी पाणी घालण्याच्या नावाखाली बिले काढत आहेत व प्रत्यक्षात मात्र लावलेले रोपे जळून जाऊ लागले आहेत.
कागदोपत्री 5500 वृक्ष लागवड केली आहे. परंतु प्रत्यक्षात 4 ते 4500 हजार रोपे भरतील .अनेक ठिकाणी खड्डे चुकवून रोपे लावले आहेत. जी रोपे लावली आहेत त्याची पाणी देण्यासाठी बीले काढलेली आहेत परंतु प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाणी दिले जात आहे.
याबाबत तेथील वनरक्षक ज्योती घागरे यांच्याशी संपर्क साधला असता,त्या म्हणाल्या आम्ही टॅंकरने दुसरे पाणी दिले आहे. असे सांगितले जात आहे .परंतु प्रत्यक्षात स्थानिक नागरिकांना विचारले असता पाण्याचा टँकर पहिल्यांदाच वन विभागाच्या हद्दीमध्ये आलेला सांगण्यात आले .म्हणजे हे पहिलेच पाणी दिले आहे परंतु वनरक्षक जाणून-बुजून खोटे बोलत आहेत व दोन वेळा पाणी दिले म्हणून बिले काढण्याच्या नादात आहेत.
वृक्ष लागवडीसाठी खड्डे काढणे, रोपे लावणे, रोपे जगवणे ,त्याचे तीन वर्षे संगोपन करणे यासाठी शासन करोडो रुपयांचा खर्च करून सुद्धा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लावलेल्या रोपापैकी 50 टक्के रोपे जिवंत राहू शकत नाहीत.
अशा अधिकाऱ्यांना विचारणार तरी कोण ? कारण वनक्षेत्र हे गावापासून चार ते पाच किलोमीटरवर असते, किंवा डोंगरावर असते या ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी असते. त्यामुळे रोपे किती लावली, खड्डे किती फूट काढले, खड्डे यंत्राच्या साह्याने काढले की मजुराने काढले, त्या रोपांना पाणी घातले किंवा नाही ? हे कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे आंधळं दळतं आणि कुत्र पीठ खातं अशी वन विभागाची अवस्था आहे.
प्रतिक्रिया
1) रोपे लावल्यापासून दुसऱ्यांदा पाणी देत आहोत . 5500 रोपे लावली आहेत. त्यामध्ये काही मरखड झालेली आहे .
वनरक्षक – ज्योती घागरे
२) तालुक्यामध्ये घरनिकित 5,500,करगणी 11, 000 मिटकी 9000, खरसुंडी 13,500 अशी रोपांची लागवड केली आहे. प्रत्येक ठिकाणी वृक्षांना पाणी घातले जात आहे.ज्याठिकाणी पाणी घातले जात नाही. अशा तक्रारी येत आहेत. त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू.
अशोक खाडे(वनक्षेत्रपाल आटपाडी)
३) घरनीकी येथे वृक्षांना पहिल्यांदाच पाणी दिले जात आहे .यापूर्वी एकदाही पाणी दिले नाही. त्यामुळे तीस ते चाळीस टक्के रोपे पाण्याअभावी जळाले आहेत–
स्थानिक नागरिक
तालुक्यामध्ये घरनिकि 5,500,करगणी 11, 000 मिटकी 9000, खरसुंडी 13,500 एवढ्या रोपांची लागवड केली आहे परंतु प्रत्यक्षात वृक्ष लागवडीचे खड्डे मजुराऐवजी यंत्राच्या साह्याने काढलेले आहेत वृक्ष लागवड केल्यापासून आज प्रत्यक्षात पाणी दिले जात आहे सर्व ठिकाणची वृक्ष पाण्याअभावी जळू लागली आहेत अधिकारी पाणी सोडले असे म्हणतात परंतु प्रत्यक्षात रोपांना पाणी दिले जात नाही व त्याची बिले मात्र अदा केली जातात.
२. वराती मागून घोडे-
ग्रामीण भागामध्ये जुनी म्हण आहे. वराती मागून घोडे अशी अवस्था वनविभागाची झाली आहे. रोपांना पाणी देण्यासाठी पैसे उपलब्ध असताना पाण्याची एखादी दुसरी खेप चुकवून त्याची बिल काढणे. आणि रोपे सुकू लागल्यानंतर किंवा जळाल्यानंतर दिखावा म्हणून पाण्याचा एखादा टँकर नेऊन पाणी दिल्यासारखे दाखवणे म्हणजेच वरातीमागून घोडे हे सत्य आहे.







