अकलूज बस डेपोच्या भोंगळ करभारा विरोधात शेखर खिलारे आक्रमक!
नातेपुते प्रतिनीधी:
अकलूज बस डेपो मध्ये सध्या प्रचंड प्रमाणात भोंगळ आणि मनमानी कारभार चालू आहे. कसलीही शिस्त अधिकाऱ्यांमध्ये राहिलेली दिसून येत नाही.नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.असपासच्या गावात फेऱ्या मारणाऱ्या बसेसला कसलेही नियोजन नाही.कोणती बस कधी येते आणि कधी जाते हेही समजत नाही.
यामुळे नागरिक वैतागुन थांबून-थांबून निघून जात आहेत.त्याचप्रमाणे बस डेपो मधील काही वरिष्ठ अधिकारी झिरो इन्कम मध्ये गाड्यांच्या फेऱ्या करत आहेत.ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी एक ही गाडी नाही आणि ज्या ठिकाणी नको आहे त्या ठिकाणी गाड्या एका तिकिटावर फेऱ्या मारत आहेत. अनेक बस मोडखळीला आल्या आहेत तर काही बस धक्क्याला लावून आहे.
या सर्व गोष्टींना जबाबदार कोण याचा जाब विचारण्यासाठी मंगळवार दि.१७/०१/२०२३ रोजी जुना बस डेपो अकलूजच्या आवारात ” जाब दो ” आंदोलन करणार असल्याचा इशारा शेखर भैय्या खिलारे यांनी निवेदनाद्वरे दिला आहे.सदर निवेदन डेपो मॅनेजर पोपळे यांनी स्वीकारले यावेळी पपू पवार,विशाल गवळी हजर होते.तसेच या आंदोलनात दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची किंवा बदलीची मागणी होणार असल्याचं शिखर खिलारे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.







