पिंगळी ता. माण येथे दिवसा ढवळ्या 3 लाख 25हजार रुपयांच्या दागिन्यांवर चोरांचा डल्ला
पिंगळी बुद्रुक ता. येथे असणाऱ्या प्रियांका कुलकर्णी यांच्या घरातून काल दुपारी कटवणीच्या साह्याने घरात प्रवेश करून सुमारे साडे सहा तोळे दागिने चोरी करण्यात आल्याची फिर्याद दहिवडी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली आहे .
अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि तुपे करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी काल दुपारी दिनांक 13 /1/23रोजी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाज्याचे दार कटवण्याच्या साह्याने उघडली घरातील दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला व सोन्याचे दागिने लंपास केले.
यामध्ये सोन्याचे गंठण 3 तोळे 864 ग्रॅम सोन्याची अंगठी दीड तोळा ,सोन्याचे नेकलेस एक तोळा, सोन्याची चैन दीड तोळा ,कानातील सोन्याचे कानातील डुल पाच ग्रॅम
असा एकूण साडेसहा तोळे वजनाचा 3लाख 24हजार 500 रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरीस गेलेला आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी.डी.तुपे करीत आहेत.







