धावडवाडीत गावकऱ्यांनी चोरांना पकडून दिला प्रसाद केले पोलिसांच्या स्वाधीन
आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या धावडवाडी गावामध्ये शेतातील इंजिन चोरून नेत असताना मालकाला दिसले त्यावेळी ग्रामस्थांनी चोरांना पकडून येथेच धुलाई केली व पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली आहे
याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास करीबुद्दीन शेख यांच्या शेतातील शेडवरून तीन अज्ञात इसम इंजिन छोटा हत्ती गाडीमध्ये भरून घेऊन जात असताना करीबुद्दीन शेख व त्यांचे मित्र अनुजित आवटे हे दूध घालून मोटरसायकल वरून घरी जात असताना त्यांच्या शेड जवळ छोटा हत्ती वाहन दिसून आले जवळ जाऊन त्यांनी वाहनाची चौकशी केली असता त्यांच्या शेड जवळील इंजिन त्या वाहनांमध्ये भरलेलं दिसलं त्यावेळी त्यांनी चोरट्यांना पकडले आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले व तेवढ्यात चोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिकांनी त्यांना पकडून चांगला चोप दिला आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले यामध्ये गणेश शंकर पवार राहणार खरसुंडी अर्जुन अण्णा पवार राहणार कानकात्रेवाडी अविनाश अण्णा देशमुख राहणार खरसुंडी या तीन जणांच्या विरोधात आटपाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धावडवाडी गावामध्ये यापूर्वी छोट्या-मोठ्या अनेक चोऱ्या झालेल्या आहेत मात्र आतापर्यंत चोरीचा उलगाडा झालेला नव्हता परंतु आत्ता हे चोर पकडल्यामुळे यापूर्वी झालेल्या चोरीचा सुद्धा उलगडा होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे







