आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
त-हाडी : शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील तापी विद्या प्रसारक संस्था संचलित आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक व ज्युनिअर सायन्स कॉलेजचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्सवात साजरे करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष निंबा भामरे होते कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच सुदाम भलकार यांच्या हस्ते झाले.
यावेळी. बालकलाकारांनी रंगबेरंगी वेशभूषा परिधान करून लोकगीत .भावगीत. देशभक्तगीते बॉलीवुड गीत .मराठी लावणी , देशभक्तीपर नाटीका , अहिराणी,अशा विविध गाण्यांवर दोनशे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. या कार्यक्रमात स़ंस्थेचे खजिनदार पुंडलिक धनगर. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सदस्य ओंकार पाटील, गटनेते तुळशिराम भामरे मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील धनगर, सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे,मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धनगर.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कलाताई भिल. ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील माजी सदस्य विलास भामरे पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे, संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे, विजय भामरे, स़चालिका उषाताई भामरे उज्वला भामरे प्रदिप भामरे मुख्याध्यापक एन. एच .कश्यप, दिलवरसिंग गिरासे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रावसाहेब चव्हाण अनिल पाटील व संतोष आडगाये यांनी केले आदींसह ग्रामस्थ शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
त-हाडी येथे कै, आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय स्कूलचे स्नेहसंमेलनात विद्यार्थी नृत्य सादर करताना







