त-हाडी:– शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे जिल्हा परिषद मराठी शाळेची शैक्षणिक सहल ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवर काढण्यात आली. यावेळी मंनु देवी, उनकदेव, नागेश्वर, या ठिकाणी काढण्यात आली.सहलीत १२० विद्यार्थी सहभागी झाले होते.
या सहलीत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेतली. मुख्याध्यापक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख म्हणून शशिकांत बोरसे व रमेश गवळी यांनी काम पाहिले. मोनिका बडगुजर, रंजिता निकुंभ, वाकळे शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
फोटो
त-हाडी येथे जिल्हा परिषद मराठी शाळेचे सहलीला हिरवा झेंडा दाखवताना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर भलकार मुख्याध्यापक गणेश पवार, योगेश धनगर, धनराज खोंडे, सुदाम धनगर, शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ उपस्थित होते







