विभुतवाडीचे दादासाहेब खताळ यांची मंत्रालयात उपसचिव पदावर पदोन्नती
विभुतवाडी ता. आटपाडी गावचे सुपुत्र श्री दादासाहेब सोपान खताळ यांची मंत्रालयात (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग च्या उपसचिव पदावर पदोन्नती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कै. सोपान उर्फ काकासाहेब खताळ माथाडी कामगार यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र असून ते विभूत वाडी गावचे असल्याने गावातील सर्व नागरिकांना त्यांचा अभिमान आहे.
सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.तर परिसरातून फोनद्वारे, वॉट्साप, व अन्य माध्यमातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.







