महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे
पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय,झरे.
व
माणदेशी फाउंडेशन म्हसवड
यांच्या संयुक्त विद्यमाने
आज विभूतवाडी ता. आटपाडी जि. सांगली येथे हळदी कुंकू समारंभ व महिलांसाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण हा कार्यक्रम पार पडला.
या द्वारे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेगवेगळ्या कौशल्यांचा विकास केला जाणार आहे.

तसेच महाविद्यालय हे चार भिंतीच्या मध्ये मर्यादित नसून, आपण जे शिक्षण महाविद्यालयात घेतो ते समाजापर्यंत कशा प्रकारे पोहोचेल. आणि समाजाला त्याचा कशा प्रकारे फायदा होईल.या दृष्टीने विचार करून शिवाजी विद्यापीठाने राबविलेल्या Best Practices या संकल्पनेनुसार आज या ठिकाणी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवणे , शोभेच्या वस्तू, बेकरी पदार्थ, टेलरिंग, मेहंदी, ब्युटी पार्लर , कॉम्पुटर प्रशिक्षक, आणि अशाप्रकारचे 40 कोर्स या माध्यमातून महिलांना दिले जाणार आहेत. या माध्यमातून महिलांना उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी विभूतवाडीच्या महिलांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला असून पुढील काही काळामध्ये काही दिवसांमध्ये त्यांचे पुढील प्रशिक्षण चालू होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक सिनेअभिनेते वनराज कुमकर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य पाटील आर.एच. सर, माणदेशी फौंडेशन चे प्रशिक्षक, ग्रामपंचायत सरपंच श्री चंद्रकांत पावणे, ग्रामपंचायत उपसरपंच हरिदास कांबळे, माजी समाजकल्याण सभापती सौ.कुसुमताई मोटे, सौ.सारिका कांबळे मॅडम, प्रा.सौ.काळेल आर.व्ही. प्रा.एन.डी.पाटील, प्रा.एस.डी.मुलाणी, प्रा.घुटुकडे एम.आर. व सर्व महिला उपस्थित होत्या.







