हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले..
चाळीसगाव
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब व जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील साहेब,आमचे नेते मा.उमेश (पप्पुदादा) गुंजाळ यांच्या आदेशाने साहेबांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव शहरात सामाजिक उपक्रम राबविण्यात आले व डेराबर्डी येथील मतिमंद निवासी विद्यालय मुलांच्या शाळेत अन्नदान व त्याच शाळेत मुलांच्या स्वयंपाकासाठी गॅस शेगडी देऊन मुलांसोबत साहेबांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले…
या प्रसंगी शिवसैनिक राहुल पाटील,संजय पाटील, नाना शिंदे,रविंद्र मराठे,दिपक पवार, सागर चौधरी,शुभम राठोड, अनिकेत पाटील, भुषण देशमुख, भरत पाटील, निरज पाटील, दिपक बारी ,पवन सैंदाने, मनीष सैंदाने, सुरज जाधव, जगदीश निकम, बागुल सर, दादु बोरसे,समाधान पाटील,शुभम पाटील, अनिल पाटील आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…







