श्री खंडोबारायाच्या यात्रोत्सवाला आजपासून रविवार ५ फेब्रुवारी पासून सुरुवात!
त-हाडी ( प्रतिनिधी)- श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबा यात्रोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. रविवारी सकाळी ७:३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त श्री खंडेराव मंदिर देवस्थान येथे सकाळी :७:३० वाजता लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर,व जय मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धनगर,प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. , श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव समिती संस्थेचे कार्यक्रमात शिवा भाऊ सांगवी कर याची लोकनाट्य तमाशा मंडळ आयोजनात व यात्रोत्सव उद्घाटन सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
खंडेराव महाराज यात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे







