तऱ्हाडी येथे वाचनालयाचे उद्घाटन
त-हाडी:- येथील स्व.सोमा दगा चव्हाण स्मृती सार्वजनिक वाचनालय चे उद्घाटन जय मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धनगर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महेंद्र शिंदे होते सोशल मीडियाच्या काळात लोप पावत चाललेली वाचन संस्कृती विद्यार्थ्यांनी जोपासावी, पालकांनी मुलांमध्ये वाचनप्रेम वाढविण्यासाठी वाचनालय जावे व स्पर्धेच्या युगात विविध प्रकारचे वाचनिय पुस्तक वाचून आपल्या ज्ञानात भर व्हावी यासाठी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे असे मत आर सी पटेल माध्यमिक विद्यालय अहिल्यापुर येथील शिक्षक संतोष पाटील व प्रा. डॉ सी.एस.करंके आर सी पटेल इंग्लिश मेडीयम स्कूल चे प्राचार्य सचिन पाटील. आर सी पटेल प्राथमिक शाळा शाळा टेकवाडे येथील मुख्याध्यापक रविंद्र खोंडे माजी सरपंच सुदाम भलकार उद्घाटनपर प्रसंगी आपले विचार मांडले .या वेळी
व प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच सुदाम भलकार तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे. तंटामुक्त अध्यक्ष तुळशिराम भामरे, माजी उपसरपंच ओंकार पाटील, मुख्याध्यापक गणेश पवार.
दिपा ओंकार पारधी, निवृत्त मुख्याध्यापक आबा शिंदे, देवेंद्र करंके .अशोक वानखेडे प्रविण शिंदे.अरूण परदेशी.कांतीलाल लोहार. विशाल करंके . किरण भलकार, नरेंद्र सोनवणे, कैलास कंरके,भुषण बागुल प्रविण शिंदे डॉ प्रा.दिलवरसिंग गिरासे महेंद्र खोंडे.आदी मान्यवर उपस्थित होते. यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब चव्हाण यांनी, तर सूत्रसंचालन अशोक सोनवणे यांनी व डॉ प्रा. दिलवरसिंग गिरासे यांनी आभार मानले.







