शालेय उपक्रमशील शिक्षक म्हणून श्री.सुरेश सलादे यांची माध्यमिक तर श्री.रतन आवारे यांची उच्च माध्यमिक निवड व सन्मान.
कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षनिक व आरोग्य संस्था राजाराम नगर संचलित बी.के.कावळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजाराम नगर येथे या वर्षी पासून शाळा पातळीवर विद्यार्थी केंद्र मानून शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक यांना उपक्रमशील शिक्षक हा सन्मान मधायमिक विभागातून एक आणि उच्च माध्यमिक विभाग यातून एक असे दोन शिक्षक सन्मानित करण्यास या वर्षी पासून सुरवात करण्याचा निर्णय प्राचार्य श्री.शेवाळे यांनी घेतला .त्यानुसार शालेय निवड समिती बनवून त्यानी माध्यमिक विभागातून श्री.सुरेश माधवराव सलादे तर माधामिक विभागातून प्रा.श्री.रतन बाबुराव आवारे यांची निवड केल्या नंतर या दोघांना हि एका समारंभात सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाघ शिक्षण संस्था अध्यक्ष श्री.शहाजी दादा सोमवंशी हे होते.तर प्रमुख उपस्थिती मध्ये सोनी टिव्ही वरील संगीत कार्यक्रम इंडियन आयडॉल फेम प्रतिक सोळसे,तर चित्रपट गीतकार विष्णू थोरे हे उपस्थितीत होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी.के.शेवाळे यांनी केले.कार्यक्रम सूत्र संचालन श्रीमती वर्षा दिघे व प्रा.सुरेश भुसाळ यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका श्रीमती व्ही.आर.जाधव यांनी केले.







