जवखेडा येथील शेतकरी देवराम पाटील यांना राज्यस्तरीय कृषी ऋषी पुरस्कार जाहीर
तऱ्हाडी:-जवखेडा ता. शिरपूर येथील आदर्श शेतकरी देवराम धनगर पाटील यांनी कृषी या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान व सेंद्रिय खत वापरून उत्पन्न वाढीसाठी जवखेडा सह भटाणे. तऱ्हाडी वरुळ. परिसरात शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन केले
या कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेस मारुती मैदान शहादा येथे भव्य ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनात त्यांना ॲग्रोवन कृषी ऋषी या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
त्यांना या पुरस्कार मिळाल्याबद्दल जवखेडा. वरुळ. भटाणे त-हाडी येथे मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच अशोक सोनवणे, सुनिल धनगर, तापी विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष सुभाष भामरे, सह परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे







