सरपंच श्रीमंत तरसे याच्या निधनाने शिवसेनेत पोकळी
पिंपरी बुद्रुक ता.आटपाडी येथील लोकनियुक्त सरपंच श्रीमंत तरसे वय वर्षे 63 यांचे दुःखत निधन झाले.उद्या दि.27 रोजी रक्षाविसर्जन आहे. मन मिळाऊ , सतत हसतमुख राहत होते.सामाजिक कार्यात व राजकारणात दबदबा निर्माण केला होता.
. अनिल बाबर यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांचा परिचय होता.
त्यांनी विकास सोसायटी मध्ये चेअरमन म्हणून काम पाहिले,10 वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते. सध्या लोकनियुक्त सरपंच होते.तर निशांत सामाजिक शैक्षणिक संस्था चे संचालक, शिवशक्ती दूध उत्पादक सस्थेचे 16 वर्षे चेअरमन होते.
आम्.अनिल बाबर व आध्यक्ष तानाजी पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली राजकीय व सामाजिक काम करीत होते.त्यांच्या निधनाने आटपाडी पश्चिम भागात शिवसेनेमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.







