राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ व महाराष्ट्र नाभिक आरक्षण समिती ‘ एक साथ ‘
समाज हितासाठी नाभिक संघटना एका विचाराने सोबत
त-हाडी ( प्रातिनिधी )
महाराष्ट्रतील नाभिक समाजातील महत्वाच्या विविध संघटना पदाधिकार्यांची बैठक सातपुर नाशिक येथे १४ फेब्रुवारी रोजी पार पडली यात राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ व महाराष्ट्र नाभिक आरक्षण समिती ‘ एक साथ ‘ राहत समाज हितासाठी दोन्ही नाभिक संघटना एका विचाराने सोबत राहुन नेता हितापेक्षा समाज हित महत्वाचे अशा सुर बैठकीत निघाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे .
महाराष्ट्रतील नाभिक समाजातील महत्वाच्या विविध संघटना पदाधिकार्यांची बैठक सातपुर
नाशिक येथे १४ फेब्रुवारी रोजी पार पडली यात राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भगवान आण्णा बिडवे व महाराष्ट्र नाभिक आरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवदास फुळवळकर सर व राष्ट्रीय अध्यक्ष किशोर गाडेकर ( बीड ) उपाध्यक्ष दादासाहेब काळे ( औरंगाबाद ) सचिव हरिष राऊत ( ठाणे ) सचिन चित्ते ( मालेगाव ) माजी अध्यक्ष धनराज सोनवणे ( धुळे ) प्रसाद गड्डीनकर ( पुसद ) अंजली प्रधान ( नाशिक ) नितीन क्षिरसागर ( बीड ) यांच्या सह अनेक पदाधि काऱ्याच्या उपस्थितीत नाभिक समाजातर्फे नाशिक गोदावरी घाटावर भव्य दिव्य संतपिठ निर्माण कार्यात व इतर समाज हिताच्या कामासाठी दोन्ही संघटना स्वतःहाचे अस्तिव अबादित ठेवून सोबत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला
समाज एकता अभियान हे समाजातील सर्व घटकांना एकत्र करून सामाजिक समस्या एकीकरणाने सोडविण्यासाठी कोणत्याही राजकीय सामाजिक नेत्यांच्या दबावाखाली न येता आपण आपला स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी निर्माण झाला आहे. सामाजिक ऐक्या शिवाय कोणतेही ऐक्य, न्याय वा सामाजिक विकास शक्य नाही. संविधानाने दिलेले हक्क अधिकारही आज समाजाला मिळताना दिसत नाही.
समाजात जाऊन वैयक्तिक, राजकीय मतभेद बाजूला सारून सामाजिक उत्थानासाठी एक झालो तर एकीकरणाचे फळ सर्वांना चाखता येतील. कोणत्याही राजकीय सामाजिक नेत्यांना डोक्यावर न घेता अथवा कोणत्याही राजकीय नेत्यांना विरोध न करता व कोणत्याही पक्षाची, नेत्याची वैयक्तिक जाहिरात न करता समाजामध्ये प्रबोधन करून समाज ऐक्यासाठी समाज एकता अभियाना मध्ये सहभागी होऊन सामाजिक कार्यास इतर सामजिक नाभिक संघटना प्रमुखानी कोणत्याही नेत्याचे गुणगान न गाता कोणत्याही आर्थिक मिळकतीची अपेक्षा न करता, कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केवळ निस्वार्थ भावनेतून समाज एक करण्यासाठी इच्छुकांनी सहभागी व्हायचे आवाहान भगवान बिडवे , शिवदास फुलवळकर , दादासाहेब काळे किशोर गाडेकर, महेंद्र खोंडे, सोनल खोंडे, नवनाथ गायकवाड, गणेश मोरे यांनी केले आहे.







