वनविभागाचे रक्षकच बनले भक्षक
लाकूडतोड साठा जप्तीत पंचनामा व प्रेस नोट,मार्किंग मध्ये आकडेवारीची हेराफेरी
आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथे वन विभागाने कारवाई करत सागवान लाकडाचा साठा जप्त केला होता. यामध्ये पंचनामा व प्रेस नोट व सपेद खडूने केलेले मार्किंग मध्ये आकडेवारीची हेराफेरी केल्याचे उघड झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की खरसुंडी गावच्या हद्दीतील किरण सुखदेव पुजारी यांचे मालकी गट क्रमांक 140 या खाजगी क्षेत्रात अज्ञात इसमाने विनापरवाना बिगर पासी, बिगर शिक्का, अवैधरित्या सागवान या मौल्यवान प्रजातीचे अनगड नग 66 घनमीटर 2.584 सरकारी माल किंमत 30 हजार 230 रुपये किमतीचा मालवाहतूक करून ठेवलेला आढळून आले असल्याची प्रेस नोट क्षेत्रपाल अशोक खाडे यांनी दिली होती.



परंतु पंचनामा करीत असताना यामध्ये 48 नग व 32 नग असे 80 नग व जळावू नग असे एकूण एक घनमीटर इतके नग पकडले असल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद केले आहे.
तर सागवन साठ्याचे एकूण नग 85 पकडल्याचे खडूने केलेल्या मार्किंग वरून दिसून येत आहे. लाकडाचा साठा जप्त केल्यानंतर प्रत्येक नगा वरती नंबरिंग केले होते त्यानुसार 85 नग जप्त केले आहेत.
या पंचनामेवरती खरसुंडीचे वनपाल वनरक्षक व वनमजूर बी.एस .ऐवळे यांच्या सह्या आहेत.तर वनक्षेत्रपाल यांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये 66 नग असल्याचे नमूद केले आहे.
खरसुंडीतील अवैध साठा पकडण्यासाठी वनपाल पांडुरंग खूपसे, वनरक्षक ज्योती घागरे व वन कर्मचारी यांनी कार्यवाही केली होती.
वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांनी दिलेल्या प्रेस नोट मधील अवैध लाकूड साठा जप्तीची आकडेवारी व खरसुंडी येथील जप्त केलेल्या लाकूड पंचनामाच्या आकडेवारी मध्ये जमीन आसमान चा फरक आहे.
तरी पंचनामा व प्रेस नोट मधील आकडेवारी मध्ये बदल का झाला याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
अवैध पकडलेल्या नगरमध्ये पंचनाम्यात आणि प्रेस नोट मध्ये जर बदल होत असेल तर अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही किंवा अवैध लाकूडतोड करणाऱ्या कडून काही अधिकारी मॅनेज झाले आहेत असे म्हटलं तरी वाव ठरणार नाही.
चौकट –
खरसुंडीतील वैद्य साठ्या चा पंचनामा वनपाल वनरक्षक व वनमजूर यांनी केला यामध्ये 80 नग एक घनमीटर इतका साठा पंचनामे मध्ये दाखवण्यात आला.
वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांनी 66 नग 2.584 घन मीटर 30.2030 रुपयाचा साठा जप्त केले असल्याची प्रेस नोट दिली.
—- पंचनाम्यातील आकडेवारी वेगळी आहे प्रेस नोट मधील आकडेवारी वेगळी आहे तर प्रत्यक्ष लाकडाचा साठा जप्त केला त्यावेळेला सफेद खडूने प्रत्येक नगावर अंक टाकले होते. शेवटच्या नगावर 85 अंक असा टाकला होता. खडूने टाकलेला शेवटचा नग 85 आहे, वन विभागाने प्रेस नोट दिलेल्या मध्ये 66 नग म्हटले आहे .तर पंचनाम्यामध्ये 80 नग म्हटले आहे.







