दिघंचीच्या चित्रकाराचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी व्हिडिओ कॉल द्वारे केले कौतुक
चित्रकार ज्योतीराम काटकर यांच्या चित्रकलेची आमदारांनी घेतली दखल…
सांगलीसह सातारा सोलापूर आदि जिल्ह्यात बॉलपेनने रेखाचित्र काढून अल्पावधीतच प्रसिद्धीत आलेले दिघंची ता.आटपाडी चे चित्रकार ज्योतीराम काटकर यांच्याशी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्हिडिओ कॉल करून संवाद साधला व त्यांच्या आगळ्यांनी वेगळ्या चित्रकलेचे त्यांनी कौतुक केले .
दिघंचीचे चित्रकार ज्योतीराम काटकर यांनी आजवर देश विदेशातील विविध क्षेत्रात कौतुकास्पद काम केलेल्या हजारहून अधिक व्यक्तींची बॉल पेनने रेखाचित्रे काढली आहेत. बॉलपेनने रेखाचित्र काढणे ही वेगळी कला त्यांनी जोपासली आहे. त्यामध्ये चित्रकार काटकर यांनी पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचेही रेखाचित्र काढले आहे.
त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व व्यक्तिरेखा चित्रांचे प्रदर्शन पुणे येथे भरवण्यात आले होते. त्या प्रदर्शनामध्ये निलेश लंके यांचेही रेखाचित्र मांडण्यात आले होते ते रेखाचित्र पाहून तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निलेश लंके यांच्याशी संपर्क साधून या रेखा चित्रा बाबत कळविले व त्या रेखा चित्राचा फोटोही त्यांनी आमदार लंके यांना पाठविला तो फोटो पाहून आमदार लंके हे भारावून गेले व त्यांनी थेट चित्रकार काटकर यांच्याशी संपर्क साधला व व्हिडिओ कॉल करून त्यांच्या कलेचे भरभरून कौतुक केले.
पारनेरच्या आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा च्या व आगळ्यावेगळ्या कलेची दखल घेतल्याने चित्रकार ज्योतीराम काटकर हे भारावून गेले आणि त्यांना भेटण्याचे निमंत्रण ही दिली आहे.
याबाबत चित्रकार ज्योतीराम काटकर म्हणाले की आमच्या कलेची घेतलेली दखल हीच आमच्यासाठी फार मोठी प्रोत्साहन आहे हे आमच्या कलेची पोच पावती आहे असे ते म्हणाले







