लोककल्याण कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज
साडेतीन वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तुत्ववान वीर पुत्र मिळाल्याने तर आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याचा नव्हत आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळे जोरावर महाराष्ट्र भूमी वर भगवा फडकला
त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठी सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक अंगार जगमता पेटता झंकार जगमता पेटता अगार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रिची गर्जना झाली.
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला.मानाचा मुजरा शिवाजी राजाला ज्याने मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले.
वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली
आणी घोडदौड सुरू झाली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले यासाठी त्यांनी पूर्ण मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज बद्दल अस्था निर्माण केली या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद नुरार बाजी या सारख्या अनेक सवंगड्यानी लढाईच्या काळात शिवरायासाठी आपल्या प्राणाची ही बलिदान देताना मागिपुढे पहिले नाही.शिवरायांच्या पुर्वी अनेक राजे होऊन गेले.शिवराया नतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणुन ओळखतान म्हणजे फक्त शिवाजी महाराज याचे कारण आहे.
स्वराज्या बद्दल असणारे प्रेम.निष्ठा पराक्रम व निष्कलक चारित्र्य शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यावंर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेक प्रजादक्ष राजे होते.शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवुन वाट काढत कितीही सकंटे आले तर डगमगुन न जाता त्यावर शिताफीने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढय शत्रुशी लढा देत एक वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले.
हवा वेगाने नव्हती
हवेपेक्षा ही त्याचा वेग जास्त होता.
अन्याया विरूध्द लढण्याचा
इरादा नेक होत.
असा जिजाऊचा शिवबा
लाखात एत नव्हे तर जगात एक होता.
लेख –
कु ललिता महेंद्र खोंडे
त-हाडी भोलेनाथ नगर अभानपुर रोड प्लॉट नंबर २०,
मो- ९४२१९२९३६०







