आयकॉनिक ॲपल ट्री नर्सरी अँड प्रि स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
प्रतीनिधी सोलापूर
सोलापूर येथील श्रीराम कृष्ण शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था संचलित आयकॉनिक ॲपल ट्री नर्सरी अँड प्रि स्कूल या शाळेच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रख्यात डॉक्टर संजय मंथाले अँट स्पेशलिस्ट व बसवेश्वर माध्यमिक शाळेचे प्राचार्य दीपक जळकोटे तर संस्थापक नागनाथ गायकवाड व संस्थेचे अध्यक्ष आनंद जाधव उपस्थित होते
यावेळी शाळेची मुख्याध्यापक स्वाती जाधव यांनी दहा वर्षाचा अहवाल सादर केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती जाधव यांनी केले .तसेच याप्रसंगी पल्लवी जाधव व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येचे हितचिंतक व पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमात छोट्या मुला मुलींनीआपल्या कलेचे प्रदर्शन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.







