आटपाडी वनविभागाकडून होतेय जनतेची दिशाभूल…..
अधिकारीच नागरिकांना चुकीची माहिती देतात… वरिष्ठाकडून चौकशी ची मागणी
आटपाडी प्रतिनिधी
वनविभागाचे अधिकारी जनतेला चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत असल्याचे अनेक पुरावे अनेक उदाहरणे समोर आली आहेत
या सर्व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
तालुक्यामध्ये वृक्ष लागवड केली आहे. यामध्ये घरणीकी, खरसुंडी, मिटकी व करगनी या गावांचा समावेश आहे.
वृक्ष लागवड होत असताना शासनाच्या नियमाप्रमाणे खड्डे काढले नाहीत. वृक्ष लागवड जमेल तशी केली आहे . लावलेल्या वृक्षांना जगवीण्यासाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी येत असतो . परंतु वृक्ष लागवडीमध्ये वृक्ष जगवण्याच्या दृष्टिकोनातून वन विभागाचा कोणताही प्रयत्न नाही. या वृक्षांना पाणी घालण्यासाठी तालुक्यातीलच अनेक टँकर मालकाला टेंडर पद्धतीने तोंडी व्यवहार करून ,पाणी पुरवण्याचा ठेका दिला आहे.
परंतु या पाणीपुरवठ्यामध्ये अनेक वेळा वृक्षांना पाणीच घातले जात नाही. तर जादा खेपा लावून वनक्षेत्रपाल ,वनपाल, वनरक्षक हे संगनमताने बिले मात्र काढत आहेत. अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत.
शासनाच्या नियमाप्रमाणे जेवढी रक्कम पाणी घालण्यासाठी आली आहे. त्यातील 60 टक्के रक्कम सुद्धा खर्ची पडत नाही. उर्वरित 40 टक्के रक्कम कुठे जाते हे कोणाला माहित पडत नाही .
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता अधिकाऱ्याकडून चुकीची माहिती दिली जात आहे.
वृक्ष लागवड असो किंवा कार्यालयातील काय माहिती हवी असेल तर ती माहिती सुद्धा चुकीची दिली जात आहे वृक्ष लागवडीसाठी खड्डे किती फूट खोल असतात खड्डे यंत्राच्या साह्याने काढतात येतात का पाणी घालण्यासाठी काय उपाययोजना आहे त्यासाठी शासनाचा किती निधी आला आहे याबाबत विचारले असता अधिकाऱ्याकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत
वन विभागातील कोणतेही दप्तर दाखवले जात नाही. किंवा वृक्ष लागवडीचे इस्टिमेट मागितले असता ते आमच्या कार्यालयात नाही ते इस्टिमेट सांगली कार्यालयात आहे .अशी उत्तरे दिली जातात.
याबाबत सविस्तर माहिती अशी की खरसुंडी येथे वृक्षतोड जोमात सुरू होती ही वृक्ष तोड थांबवण्यासाठी वन विभागाने कारवाई करत सागवान लाकडाचा साठा जप्त केला होता. परंतु वनपाल व वनरक्षक वनमजूर यांनी वनक्षेत्रपाल यांना चुकीची माहिती दिली असल्याचे उघड झाले आहे. तर वनक्षेत्रपाल यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिलेली माहिती चुकीची असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
ज्यावेळी प्रत्यक्षात सागवान जातीच्या लाकडाचा साठा जप्त केला त्या वेळेला या साठ्याच्या प्रत्येक नगावर खडू नये मार्किंग केले होते त्यामध्ये एकूण 85 नग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या प्रेस नोट मध्ये अनगड नग 66 घनमीटर 2.584 सरकारी माल किंमत 30 हजार 230 रुपये किमतीचा साठा असलेले सांगितले आहे.
तर पंचनामा मध्ये 48 नग व 32 नग असे 80 नग व जळावू नग असे एकूण 1 घनमीटर इतके नग पकडले असल्याचे नमूद केले आहे.
तर पंचनामा करीत असताना खरसुंडीचे वनपाल पांडुरंग खूपसे ,वनरक्षक ज्योती घागरे व वनमजूर बी.एस .ऐवळे यांच्या सह्या आहेत.
चौकट
सागवान साठा पकडल्यानंतर ओंडक्यावर खडूने मार्किंग केले होते .त्यामध्ये 85 नग दिसून येत आहेत. तर वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या माहितीमध्ये 66 दाखविले आहेत. तर पंचनामा वनपाल पांडूरंग खूपसे, वनरक्षक ज्योती घागरे व
प्रत्यक्ष सापडलेला लाकडाचा साठा पंचनामा केलेली आकडेवारी आणि प्रसिद्धी माध्यमाला दिलेली आकडेवारी यामध्ये तफावत दिसून येत आहे .तरी याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.







