“अश्विनी पाटील यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून फेलोशिप प्राप्त”
त-हाडी श्री.शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै.पा.रा.घोगरे विज्ञान महाविद्यालयातील जैव रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्रा. अश्विनी किशोर पाटील यांना विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या कडून पीएच. डी.संशोधनासाठी सावित्रीबाई फुले फेलोशिप प्राप्त झाली.
विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या एकूण १०३३ संशोधकांच्या यादी मध्ये प्रा.अश्विनी पाटील यांचे नाव जाहीर झाले असून प्रा.अश्विनी पाटील या शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथील माजी सरपंच श्री.किशोर भटा पाटील यांच्या सुकन्या. तर त-हाडी येथील प्रगतीशील शेतकरी .उद्धवराव शालिग्राम करंके यांच्या स्नुषा व शिंदखेडा महाविद्यालयातील प्रा.तुषार करंके यांच्या पत्नी आहेत.
प्रा.अश्विनी पाटील यांना मिळालेल्या फेलोशिप बद्दल शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे रोहीदासाजी पाटील श्री.शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे एक्झी. बोर्डाचे चेअरमन मा. कुणालजी पाटील, श्री.शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष तथा शिंदखेडा स्थानिक कार्यकारिणीचे चेअरमन प्रफुल्लकुमार सिसोदे, डॉ.एस.टी.पाटील ,प्रशासकीय अधिकारी प्रमोदजी पाटील,.नरेंद्र सुर्वे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम व्ही.पाटील, शिंदखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार पाटील उपप्राचार्य डॉ.के.एम.बोरसे शिंदखेडा महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.टी.राऊळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेछ्या दिल्या.







