शिक्षक भरतीसाठी पैसे घेऊन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल…
आटपाडी तालुक्यातील तरुणांची फसवणूक….
शिक्षक भरतीसाठी पैसे घेऊन फसवणूक प्रकरणी शैलजा दराडे व त्यांचे बंधू दादासाहेब दराडे यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील शिक्षक पोपट सूर्यवंशी यांचे नातेवाईक यांना शिक्षक पदावर नेमणुकीसाठी 27 लाख रुपये रोख रक्कम मागितली होती.
15 जून 2019 रोजी पुणे येथे प्रशासनातील अधिकारी शैलजा दराडे यांचे बंधू दादासाहेब दराडे यांनी रक्कम स्वीकारली होती.
त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये तक्रारदार शिक्षकांची नावे आली नाहीत. तेव्हा पैसे परत मागितले त्यावेळेस दादासाहेब दराडे यांनी स्टॅम्प पेपर वर लेखी लिहून दिले होते. व चेक सुद्धा दिला होता.
मात्र अद्याप पैसे न मिळाल्याने 22 फेब्रुवारी रोजी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये शैलजा दराडे व दादासाहेब दराडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दराडे यांनी पंढरपूर, सांगोला, मोहोळ, इटकी ,सांगली जिल्ह्यातील तासगाव, आटपाडी, कडेगाव ,बीड ,पुरंदर ,मधील बहुतांश शिक्षक कुटुंबातीलच लोकांकडून डीएड या पदावर शिक्षक म्हणून नियुक्ती देतो असे म्हणून पैसे घेतलेले आहेत.
जवळपास 44 लोकांचे पैसे घेतले असून डी.एड शिक्षक नियुक्तीसाठी 12 लाख रुपये व b.ed शिक्षक नियुक्तीसाठी 15 लाख रुपये प्रमाणे पैसे घेतले आहेत.
शिक्षक यांचे कडे आदर्श शिक्षक म्हणून आपण पाहत असतो परंतु या शिक्षक भरतीसाठी जर बाजार चालवला असेल तर अशा वेळी चाप बसवणे गरजेचे आहे.







