प्रतिभा बारी यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित …
त-हाडी
जिल्हा परिषद केंद्र शाळा अर्थे खुर्द येथील शिक्षिका प्रतिभा रमेश बारी यांना तरुणाई फाउंडेशन कुटासा तालुका अकोट जिल्हा अकोला च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 12 फेब्रुवारी 2023 रोजी शिवाजी महाविद्यालय अकोला येथे आमदार अमोल मिटकरी सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष नारायणराव अंधारे उद्घाटक डॉक्टर गजानन नारे अध्यक्ष तुळशीराम बोबडे हे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल मिटकरी विधानपरिषद महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय संगीता अढाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष अकोला, प्राध्यापक निलेश जळमकर सिने दिग्दर्शक सोनी टीव्ही, कुणाल मेश्राम महाराष्ट्र हास्य जत्रा फेम , मा. आमदार रणधीर भाऊ सावरकर अकोला पूर्व मतदार संघ आदी उपस्थित होते.
तरुणाई फाउंडेशन चे संस्थापक संदीप देशमुख यांनी सांगितले की सामाजिक कार्य म्हणून कोरोना काळात यांनी महिला शिक्षिकांना ज्ञानाचे धडे दिले, निपुण भारत अंतर्गत महिलांचे प्रबोधन केले, धुळे जिल्ह्याच्या सीईओ माननीय बुवनेश्वरी एस यांच्या स्मार्ट अटेंडन्स ॲप द्वारे वर्गाची उपस्थिती 100% वाढवण्याचा प्रयत्न केला, तसेच विद्यार्थ्यांनसाठी राज्यस्तरीय उपक्रम राबवित असतात.
प्रतिभा बारी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल माननीय गटशिक्षण अधिकारी . जी. एल. सुरवाडकर, शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय डी. पी. बुवा, केंद्र प्रमुख आदरणीय नंदकिशोर पाटील, मुख्याध्यापक भटू शेवाळे यांनी अभिनंदन केले.







