• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वारकऱ्याच्या मुलाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी रोहिदास महाराजांनी जमवला 26 हजाराचा निधी……मालेवाडीवाशीयांची दानशूरता, आणखी मदतीची गरज.

माणगंगा by माणगंगा
February 27, 2023
in महाराष्ट्र
0
वारकऱ्याच्या मुलाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी रोहिदास महाराजांनी जमवला 26 हजाराचा निधी……मालेवाडीवाशीयांची दानशूरता, आणखी मदतीची गरज.

वारकऱ्याच्या मुलाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी रोहिदास महाराजांनी जमवला 26 हजाराचा निधी

मालेवाडीवाशीयांची दानशूरता, आणखी मदतीची गरज.

गंगाखेड प्रतिनिधी    
             पंढरपूरच्या पांडुरंगाची  वारी न चुकता करणाऱ्या  पांडुरंग महाराज सदगे यांच्या मुलाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांच्या आवाहानावरून मालेवाडीवासियांनी रविवारी दरलिंगेश्वर संस्थानातील कीर्तनाच्या कार्यक्रमात 26 हजाराचा निधी जमवत संबंधिताकडे सपूर्द केला.  

                                पांडुरंग महाराज सदगे हटकरवाडी तालुका मानवत येथील रहिवासी आहेत .पिढ्यापासून सदगे कुटुंब हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे वारी न चुकता करतात. वारकरी संप्रदायात त्यांचे जिल्हाभर नाव आहे .पण मागील काही दिवसापासून मृदंग वादक असलेल्या त्यांचा मुलाची अचानक किडनी खराब झाली. यासाठी आजपर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. पांडुरंग महाराजांनी आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी घर ,शेती विकून टाकली. आजपर्यंत जमवलेली सर्व मायापुंजी लेकरासाठी दवाखान्यात खर्च केली. स्वतःची किडनीही दिली. पण ती फेल झाली. परत एकदा त्या मुलाचे किडनी प्रत्यारोपण करायचे असून त्यासाठी दहा लाखापर्यंत चा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्रभर रामायणाचार्य म्हणून ख्याती असलेले ह भ प रामराव महाराज ढोक यांचे शिष्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांचे रविवारी मालेवाडी येथील दरलिंगेश्वर संस्थानात सप्ताहाच्या निमित्ताने कीर्तन सेवा संपन्न झाली. कीर्तनात म्हस्के महाराजांनी पांडुरंग महाराज सदगे यांच्या मुलाच्या दवाखान्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. मस्के महाराजांच्या आवाहनास उपस्थित भाविक भक्तांनी दाद देऊन मोठ्या प्रमाणात मदत केली. एकूण 26 हजाराची मदत हजारो भक्तांच्या उपस्थितीत पांडुरंग महाराज यांच्याकडे सपोर्ट करण्यात आली. सदगे परिवारासह आज पर्यंत पाच ते सहा वारकऱ्यांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी लागणारे पैसे मिळवून देण्यासाठी  धावून आल्याबद्दल रोहिदास महाराज मस्के यांचे किर्तन स्थळी उपस्थित असलेले आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जाहीर कार्यक्रमात आभार मानले. यासाठी ह भ प अनंत महाराज बर्वे, बालासाहेब बचाटे , नारायण महाराज मालेवाडीकर, राम महाराज कुकडे, महारुद्र महाराज बोबडे, परमेश्वर मुठाळ, भानुदास शिंदे आदीसह सर्व गावकऱ्यांनी या कामी पुढाकार घेतला होता. बाहेर गावावरून आलेल्या भक्तांनीही सढल हाताने मदत केली.
Views: 175
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आवळाईतील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रशासनाने हटवला शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या

आवळाईतील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रशासनाने हटवला शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)