आवळाईतील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रशासनाने हटवला
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या
आटपाडी प्रतिनिधी
आवळाई ता. आटपाडी येथे पहाटे पाचच्या सुमारास अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना गावातील शिवप्रेमी तरुणांनी केली होती. ही बाब प्रशासनाला समजल्यानंतर तुम्ही विनापरवाना छत्रपति शिवरायांचा पुतळा बसवला आहे .या कारणास्तव प्रशासनाने पुतळा हटवून तहसील कार्यालयामध्ये ठेवला आहे.

ही घटना तालुक्यामध्ये सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर दिवसभर प्रशासन व शिवप्रेमी युवकांमध्ये सतत वादावादीचा मुद्दा होत राहिला त्यानंतर शिवप्रेमी युवकांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा चोरीला गेल्याचे निवेदन नायब तहसीलदार यांना दिले आहे.
महाराजांचा पुतळा आठवत असताना पुतळ्याला संरक्षण मिळण्यासाठी जे ब्रॅकेट तयार केले होते ते ब्रॅकेट तोडून प्रशासनाने पुतळा चार चाकी छोटा हत्तीमध्ये घेऊन गेले आहेत. तसेच पुतळा हटवताना पुतळ्याला तडा गेल्याचे मत येथील शिवप्रेमी कार्यकर्त्यांचे आहे.

घटनास्थळी डी वाय एस पी अश्विनी शेंडगे प्रांताधिकारी संतोष भोर यांनी प्रत्यक्षात भेट देऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली व रीतसर पुतळा बसवण्यासाठी अर्ज करा आम्ही आठ ते दहा दिवसांमध्ये तुम्हाला परवानगी देतो असे प्रांताधिकारी संतोष भोर यांनी सांगितले.
या सर्व घटनेमुळे आवळाई मध्ये पोलीस छावणीचे स्वरूप आले होते तर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तसेच तालुक्यामधून प्रत्येक गावातून शिवप्रेमी आवळाईच्या दिशेने जाताना दिसत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा पुतळा प्रशासनाने काढल्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी तेथे छोटा पुतळा बसवण्यात आला होता तोही प्रशासनाने हटवला तर यामध्ये काही छोट्या शिवप्रेमींना पोलिसांनी काट्याने मारहाण केल्याची चर्चा परिसरामध्ये आहे
प्रशासनाने पुतळा हटवून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याचे मत शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले गावात कोणाचाही विरोध नसताना पुतळा का हटवला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. पुढील काळामध्ये प्रशासन कोणती भूमिका घेत आहेत याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे







