महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे, पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर दि. २३ फेब्रुवारी ते ०१ मार्च २०२३ या कालावधीत होत असून शिबिराचा पाचव्या दिवशी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. सुधीर इंगळे हे उपस्थित होते. निरपेक्ष बुद्धीने काम करणारी माणसं एन.एस.एस च्या माध्यमातून घडतात.
तरुण पिढीने वाढदिवसाच्या फॅशन मधून बाहेर पडून महाराष्ट्रीयन संस्कृतीकडे उघढ्या डोळ्यांनी बघायला हवं. जर तरुणांना संत कळाले तर त्यांना देव कळतील आणि देव कळाले तर निसर्ग कळेल. वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व ह्या गोष्टी शिकवण्याच महत्त्वाचं काम एन.एस.एस करत असते.
त्यानंतर शासन, प्रशासन, शिक्षण गोष्टींना एकत्र आणण्याचं काम एन.एस.एस करत असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करता एन.एस.एस विद्यार्थ्यांच्या साठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर भोंदूगिरी करणारे सामान्य जनतेला कसे फसवतात हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले, आणि इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टींपासून कस लांब राहिले पाहिजे हे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डी.एस. देवकुळे यांनी तर प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी एम.डी. खांडेकर यांनी केले.
तर आभार प्रा.व्ही.ए.खिलारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. एम.एस. शिंगाडे, प्रा.एन. डी. पाटील, प्रा.श्रीमती.एम.आर. घुटुकडे, श्री.जे.जे. फकीर तसेच जानुबाई विद्यालयाचे वस्तीगृहातील विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







