महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे, पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे. महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाकरिता मौजे विरळी या ठिकाणी दि. २३ फेब्रुवारी ते ०१ मार्च २०२३ या कालावधीत होत आहे. शिबीराचा चौथा दिवस आणि व्याख्यानमालेचा तिसरा दिवस.
तिसऱ्या दिवसाचे विचार पुष्पगुंपण्यासाठी पाणी फाऊंडेशनचे अजितदादा पवार हे उपस्थित होते. पाणी फाऊंडेशन या विषयावर बोलताना ते म्हणाले की या भूमीला इंग्रजांनी माणसालाच काय जनावराला सुद्धा राहण्याच्या लायकीची माणची भूमी योग्य नाही आणि खऱ्या अर्थाने ते योग्य होतं पण पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून या तालुक्यात जे काम उभे राहिले.
म्हणजे दोन कोटी पंचवीस लाख घनमीटर इतकं काम या तालुक्यात झालेले आहे. या तालुक्यासाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून टँकर आणि चारा छावणी यासाठी 149 कोटी रुपये खर्च होत होते. पण आजच्या घडीला तात्पुरत्या उपाय योजनेसाठी एकही रुपया खर्च होत नाही, ही या पाणी फाऊंडेशनची ताकद आहे.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक यु.सी. नलवडे आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे म्हणजेच जवळजवळ ५१ टक्के तरुण या देशात आहेत. ही तरुणाची शक्ती देशहितासाठी, चांगल्या गोष्टींसाठी वापरणे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्ही.ए. खिलारी तर प्रास्तविक प्रा.डी.एस. देवकुळे यांनी केले. तर आभार एम. एस. शिंगाडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.एन.डी. पाटील, प्रा.एस.के. वाघमोडे, प्रा.श्रीमती.एम.आर. घुटूकडे, श्री.जे.जे. फकीर श्री.एम पी. नरळे, गावातील ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.







