• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

झरे पंचक्रोशीच्या वतीने प्रा. साहेबराव चवरे यांचा सपत्नीक सत्कार

माणगंगा by माणगंगा
February 28, 2023
in सांगली
0
झरे पंचक्रोशीच्या वतीने प्रा. साहेबराव चवरे यांचा सपत्नीक सत्कार

झरे पंचक्रोशीच्या वतीने प्रा. साहेबराव चवरे यांचा सपत्नीक सत्कार

प्रतिनिधी /झरे

आज झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे संस्था, शाळा, परिसरातील हितचिंतक, पालक व ग्रामस्थांनी जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेखाताई चवरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रा. साहेबराव चवरे व सौ. रेखाताई चवरे यांना ‘सुसंगत फौंडेशन’ पुणे यांच्या वतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. त्याप्रित्यर्थ आज शनिवार दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी झरे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या साहेबराव चवरे सरांना प्रत्यक्षपणे शाळेत शिकवणारे शिक्षक बापूसाहेब स्वामी गुरुजी यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. म्हणजेच गुरुने शिष्याचा सत्कार केला हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. यावेळी बोलताना स्वामी गुरुजी म्हणाले की, शालेय जीवनात सरांची उंची कमी होती, परंतु सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उंची खूप मोठी झाली याचा मला शिष्य म्हणून अभिमान वाटतो.

प्रा. साहेबराव चवरे सर हे अशिक्षित कुटुंबात जन्माला येऊन अत्यंत खडतर व प्रतिकूल परिस्थितीतून संघर्षमय जीवन जगत उच्च शिक्षण घेऊन, मराठीचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी 33 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे.

शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय व साहित्यिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे,असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.

‘शिवकला ज्ञान प्रबोधिनी’ चे प्रवर्तक भीमाशंकर स्वामी सर यांनी शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक नामदेव यादव सर, जानुबाई विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिकलगार सर, आटपाडी तालुका आर. पी. आय अध्यक्ष धनंजय वाघमारे, शंकर पाटील, जागृती वाचनालयाचे माजी सचिव विलास कारंडे सर, जि. प. प्राथ. शाळा झरेच्या मुख्याध्यापिका सौ. डांगे मॅडम यांनी सुद्धा त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी बोलताना जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब म्हणाले की, कै. पांडुरंग कातुरे आण्णा व प्रा. साहेबराव चवरे सर हे माझे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील गुरू आहेत. तर जानुबाई विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दस्तगीर शिकलगार सर म्हणाले की, चवरे सरांमुळे मला अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली.

तसेच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञान सुद्धा चवरे सरांमुळे मिळाले . तर पुण्याच्या API व सरांच्या कन्या अमृता चवरे वाघमोडे बोलताना म्हणाल्या की, आम्हा तिन्ही भावंडांचे प्रेरणास्थान हे आमचे आईवडील आहेत. त्यांच्यामुळे आम्ही यशस्वी झालो. त्याचबरोबर विलास कारंडे सर म्हणाले की, सरांच्या लेखनामुळे माझी साहित्यिक मैत्री निर्माण झाली याचा मला आनंद झाला आहे. तर धनंजय वाघमारे म्हणाले की, माझे शालेय गुरू व माझे आधारस्तंभ व मार्गदर्शक म्हणून चवरे सर हे मला वंदनीय आहेत. मी आज जो उत्तम वक्ता झालो याचे श्रेय श्री. चवरे सर यांचेच आहे.

यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे म्हणाले की, आयुष्याच्या वाटेवर चालत असताना माझी तीनही मुले उच्च शिक्षित व सुसंस्कृत बनवली. गरजेपेक्षा एक रुपयाही जास्त दिला नाही, आणि गरजेपेक्षा एक रुपयाही कमी पडू दिला नाही. यामुळेच मुले योग्य वळणावर आहेत. आज जी परिस्थिती तयार केली आहे. त्यात ‘बापाचा व पापाचा एक छदामही नाही असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात.

त्यावेळी त्यांनी लवकरच जागृती वाचनालयाची इमारत व शाळेसाठी एक सभागृह बांधण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब , सचिव भीमाशंकर स्वामी सर, संचालक रमेश खोत साहेब , माजी उपसभापती सौ. पद्मावती मेटकरी मॅडम, बापूसाहेब स्वामी गुरुजी, विलास कारंडे सर, विभूतवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक शशिकांत सुतार सर, जानुबाई विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दस्तगीर शिकलगार सर, आटपाडी तालुका आर. पी. आय. अध्यक्ष धनंजय वाघमारे, शंकर पाटील, स्वाती सरगर, इंजिनिअर सत्यजित चवरे, ॲड. कुंडलिक सरगर, API अमृता चवरे, झरेचे माजी सरपंच गजानन राजमाने, अर्जून पारेकर, नारायण भानुसे, कुरुंदवाडीच्या सरपंच सौ. अरुणा जावीर, अर्जुन करडे, झरेच्या पोलीस पाटील जाई लोहार, कल्पना नष्टे, आशाताई घोणते, प्रज्ञा देशपांडे, सारिका सादिगले, सतीश सादिगले, माजी सैनिक सुरेश माने, माजी सैनिक औदुंबर यादव, रंभाजी सुळे, लालासो माने, उद्धव राजमाने, दयानंद वाघमारे, डाॅ. प्रथमेश स्वामी यांच्यासह परिसरातील पालक व ग्रामस्थ, सहकुटुंब शिक्षक स्टाफ, आजी माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वाघमारे सर व आभार हिंदूराव वाघमोडे सर यांनी मानले.

Views: 202
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
कांद्याच्या अल्प दराने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी…….५ ते ६ रुपयांवर आला कांदा: उत्पादन खर्चही निघेना

कांद्याच्या अल्प दराने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी.......५ ते ६ रुपयांवर आला कांदा: उत्पादन खर्चही निघेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)