टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीकृष्ण वाडीले होते तर प्रमुख अतिथी म्हणून भरवाडे गावाच्या सरपंच .भारती दिलीप पटेल निवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिलीप येशी शाळेचे माजी विद्यार्थी सिव्हिल इंजिनियर अजिंक्य रमेश शिरसाठ खामखेडा उपसरपंच प्रतिनिधी हिलाल येशी सामाजिक कार्यकर्ते चतुर आण्णा कोळी कल्याणी ड्रेसेस संचालिका नयना साळुंखे माजी उपसरपंच सदाशिवभाऊ वाडीले ग्रामपंचायत सदस्य दुर्गेश पटेल,सदस्या ज्योतीताई पारधी शालेय व्यवस्थापन तज्ञ सदस्य प्रा.एस.एम.पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज धनगर, पालक प्रतिनिधी भैय्या धनगर,रतिलाल येशी,पालक प्रतिनिधी नितीन वाडीले,कांतीलाल शिरसाठ,माजी सदस्या आशा भील उपस्थितीत होते.मुख्याध्यापक आर.बी.खोंडे यांनी आपल्या प्रास्तविकातून वार्षिक बक्षीस वितरण या कार्यक्रम घेण्यामागचा
उद्देश व महत्त्व पालक आणि मान्यवरांना विविध उदाहरणे देवून सांगितले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन केले.मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यानंतर शाळेतील बालवाडी ते ४ थी तील १२३ विद्यार्थ्यांना वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच वर्षभर मूल्यमापन करून काही विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले त्यात बालवाडी वर्गातून गायत्री धनगर,आरती ढोले,कल्याणी कुंभार,मयंक धनगर, इयत्ता पहिलीतून मिताली भोई,मनस्वी धनगर,मृणाल कोळी,ओम सोनार,खुशल धनगर,इयत्ता दुसरीतून आनंद सोनवणे,हर्षल धनगर,रेवती वाडीले,मिताली धनगर इयत्ता तिसरीतून प्रांजल वाडीले,हितेश्वरी धनगर इयत्ता चौथीतून धिरज धनगर,मयूर शिरसाठ,तनवी पटेल,कृपाली धनगर या विद्यार्थ्यांना शै.वर्ष २०२३-२३ या वर्षासाठी आदर्श विद्यार्थी म्हणून मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
पालक प्रतिनिधी भैय्या धनगर यांनी आपल्या मनोगतातून शाळेत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे व उपक्रमांचे मनापासून कौतुक केले व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व पालकांच्या वतीने अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इंग्रजी शिक्षक अनिल माळी व उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय पटेल,इंग्रजी शिक्षक अनिल माळी तसेच उपशिक्षिका बबिता काटोळे,जयश्री पाटील बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी बी.एल.पावरा, ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.
फोटो – आर,सी पटेल, प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण करताना शालेय व्यवस्थापन समिती उपध्यक्ष श्रीकृष्ण वाडीले, भरवाडे सरपंच,भारती पटेल, निवृत्त साहाय्यक प्रकल्प अधिकारी दिलीप ईशी, अजिंक्य शिरसाट, सदाभाऊ वाडीले, मुख्याध्यापक आर,बी, खोंडे, शिक्षक शिक्षिका व पालक उपस्थित होते







