वर्षा तुरूकमाने यांना दलीत-संवर्ण संघर्ष अभ्यासा मध्ये पिएचडी
रिसोड ता.4 मार्च 2023= रिसोड येथिल वर्षा विठ्ठलराव तुरूकमाने यांनी घरकाम करीत महाराष्ट्रातील मराठी कादंबरी मधुन प्रकाशित झालेला दलित-संवर्ण संघर्ष एक अभ्यासावर पिएचडी प्राप्त केली आहे.त्यांच्या शिक्षण घेण्याच्या आवडीने त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.
रिसोड येथिल वर्षा विठ्ठलराव तुरूकमाने यांना शिक्षणाची प्रारंभा पासुनच आवड,पुढे मदन खोडके यांच्याशी विवाह झाल्या नंतर त्यांच्या शिक्षणाला पती मदन खोडके यांनी पुर्णपणे सहकार्य केले.पुढे वर्षा तुरूकमाने यांनी पिएचडी पुर्ण करण्याचा संकल्प केला.परंतु पिएचडी चा अभ्यास,शोधप्रबंध सादर करणे हे खर्चाचे आसल्याने त्यांनी शिक्षणाला थांबा दिला,परंतु मणामध्ये पिएचडी पुर्ण करण्याचा संकल्प स्वस्थ बसु देत नव्हता.
परंतु छत्रपती संभाजी नगर येथिल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा मध्ये पतीच्या सहकार्याने शोध प्रबंधासाठी नोंदणी केली.यावेळी डाॅ.राम रौनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घरकाम करीत “महाराष्ट्रातील मराठी कादंबरी मधुन चित्रित झालेल्या दलित-सवर्ण संघर्ष,एक अभ्यास.काही निवडक कादंब-यांच्या संदर्भात वरील विषयावर शोधप्रबंध सादर केला.या विषया मध्ये नुकतीच वर्षा तुरूकमाने यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा मधुन पिएचडी प्राप्त झाली आहे.
या साठी त्यांना स्नेही,आप्तेष्ट ,प्राध्यापक वर्गाचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.घरकाम करीत सुध्दा शोध अभ्यासाने पिएचडी पर्यंत चे शिक्षण घेऊ शकतो हे वर्षा तुरूकमाने यांनी दाखवुन दिले आहे.







