कलमाडी सरपंच यांना” महिला रत्न “पुरस्कार प्रदान.
________________________________
डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील_ कलमाडी तालुका शिंदखेडा येथे नुकत्याच झालेल्या ग्रा प निवडणुकीनंतर उघड्यावर सौचाच बसणाऱ्या महिलांसाठी येथील सरपंच गोजरताई भिल व उपसरपंच सोनू दादा झालसे यांनी महिला शौचालय सुरू करण्याचा पहिला निर्णय घेतल्याने आज कलमाडी ग्रा प सरपंच यांना मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा महाराज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ता श्रीमती मेधाताई पाटकर व मराठा सेवा संघ प्रदेशाध्यक्ष मा वैशाली पाटील यांच्या हस्ते “महिला रत्न पुरस्कार “देऊन ग्रा प कलमाडी यांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी पुरस्कार स्वीकारताना सरपंच गोजरताई भील उपसरपंच सोनू दादा झालचे ग्रामसेवक हंसराज पाटील इ उपस्थित होते यामुळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे







