हरी ओम नगर येथील अखंड हरीनाम सप्ताहाची महाप्रसादाने सांगता .!!!
प्रमोद महाराज सायंकर यांचे काल्याचे किर्तन संपन्न
– महाराष्ट्र हि साधु संताच्या पावन पदपर्शाने पावन झालेली भुमी असुन याच महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात जास्त संत महात्मे होऊन गेले आजही या साधु संत माहत्म्यांनी घालुन देलेले नेम सप्ताह आजही वयोवृद्ध व युवा पिढी मोठ्या उत्साहात करत आहेत
यामध्ये जटवाडा रोड हरी ओम नगर येथील श्री.पचंमेश्वर विठ्ठल रख्माई मंदिर सालाबादप्रमाणे सात दिवसीय भव्य दिव्य किर्तन महोत्सव सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मंडळींच्या किर्तनाचे आयोजन तसेच हरी ओम नगर मीत्र मंडळींच्या वतीने भव्य ज्ञानेश्वरी पारायन व तुकाराम गाथा भजन व अन्नदान, या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता शनिवारी श्री ह. भ.प.प्रमोद महाराज सायंकर यांचे काल्याचे किर्तनाने व महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या काल्याच्या किर्तनाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सप्ताहाचे हे दुसरे वर्षे होते.या कार्यक्रमासाठी सप्ताह संयोजन समिती व समस्त हरी ओम नगर मीत्र मंडळ यांनी परीश्रम घेतले,







