पर्यावरण पूरक होळी साजरी करा
त-हाडीचे लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनिल धनगर यांचे आवाहन
त-हाडी
लहान मुलांपासून तर सर्वांनाच आणि सर्वांच्या आवडीचा सण म्हणजे होळी. होळीला पुरणपोळीवर ताव मारून दुसऱ्या दिवशी रंगपंचमीनिमित्त एकमेकांवर पिचकारीतून रंग उडवण्यासारखा दुसरा आनंद नाही. लहान-थोर सर्वांच्याच आनंद आणि उत्साहाचा केंद्रबिंदू असलेल्या होळीसाठी आता त-हाडी परिसरातील येथील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. विविध प्रकारच्या पिचकाऱ्या आणि रंगांनी शहरातील पाचकंदिल चौक मधील बाजारपेठ रंगीबेरंगी झाली आहे.
धुळवडीच्या उत्साहात वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय आणि रासायनिक रंग टाळत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनिल धनगर यांनी केले आहे नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी ” या माध्यमातून केले आहे.
बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी छोटा भीम, अँग्री बर्ड, डोरेमॉन आणि डोरा कार्टूनच्या पिचकाऱ्यांची बाजारात विक्री सुरू आहे.
माश्याच्या आकारातील पिचकाऱ्यांनाही लहानग्यांची पसंती मिळत आहे. कार्टून पिचकाऱ्यांच्या किमती 75 पासून 700 रुपयांपर्यंत आहेत. जास्तीत जास्त पाणी राहू शकेल, अशा नवीन आकार आणि डिझाईनच्या स्कूल बॅग पिचकाऱ्यांना अधिक मागणी आहे.
. होळी म्हणजे रंगांचा सण. त्यानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन रंगांची उधळण करा. परंपरा जपत होळी नक्की बांधा; पण त्यासाठी वृक्षतोड करू नका. टाकाऊ पदार्थांची होळी करा. ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शक्य तितक्या सुक्या आणि इकोफ्रेंडली रंगांनी होळी खेळा. अशा आवाहन यावेळी करण्यात आले आहे – पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. बेसावधपणे रंगांचे फुगे डोळ्यावर पडले तर त्यामुळे इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे रासायनिक रंगांचा व प्लास्टिक पिशव्या वा फुग्यांचा वापर न करताच होळीचा सण साजरा करा असे आवाहन लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनिल धनगर यांनी केले आहे







