उद्यापासून सकाळच्या सत्रात शाळा—मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आदेश—-शिक्षक संघाच्या मागणीला यश
सांगली
गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असून वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई, वीज कपात या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो,याचा विचार करून ८ मार्चपासून सांगली जिल्ह्यातील सर्वच शाळा सकाळ सत्रात सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत भरविण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी शिष्टमंडळाच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे निवेदन देऊन केली होती.
उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व नगरपालिकेच्या सर्वच शाळा बुधवार दिनांक ८ मार्चपासून सकाळ सत्रात सकाळी ७:२० ते ११:३० या वेळेत भरवण्याचे लेखी आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने काढले असून शिक्षक संघाच्या मागणीला यश आल्याची माहिती महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ सांगली शाखेचे जिल्हाध्यक्ष अमोल माने सरचिटणीस राहुल पाटणे यांनी दिली.







