जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा नं.2 पलूस मध्ये गरीब,कष्टकरी महिलांचा सन्मान
मुलींनी कर्तुत्ववान महिलांचे फलक हाती घेऊन जगभरातील स्त्रियांना केले अभिवादन*
पलूस येथील जिल्हा परिषदेच्या शाळा नं.२ मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गरीब कष्टकरी महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला. विधवा कष्टकरी महिला शारदा पवार तसेच सौ पूजा रावळ या महिलांना शाल श्रीफळ गुलाब पुष्प पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित कष्टकरी महिलांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर महिला दिनाचे महत्त्व व जगभरातील महिलांचे समाज उभारणीत असलेले योगदान यावर उपक्रमशील शिक्षक मारुती शिरतोडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील मुलींनी आपल्या हाती कर्तृत्ववान महिलांच्या नावांचे फलक घेऊन आम्ही यांचे वारसदार असे म्हणत खूप शाळा शिकण्याची प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका उज्वला पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शैलजा लाड यांनी केले तर सुनिता पवार यांनी आभार मानले.यावेळी शिक्षक जगन्नाथ शिंदे सह विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.







