मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी व सहकार भारती तर्फे बचतगटातील महिलांचा सन्मान
तऱ्हाडी:-मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी व सहकार भारती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने तऱ्हाडी येथील भवानी चौकात महिला बचत गटात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून कर्तुत्ववान महिला बचत गट पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक ओंकार दशरथ पाटील.
माजी उपसरपंच प्रमोद परदेशी .पोलीस पाटील प्रतापसिंग गिरासे. पीक संरक्षण सोसायटी चे माजी चेअरमन विशाल करंके. सहकार भारती जिल्हाध्यक्ष जयश्री चव्हाण. डी.बी .पाटील.युवा नेतृत्व शरद सोनवणे . किरण भामरे. ज्ञानेश्वर भामरे. अशोक वानखेडे . मोतीलाल भामरे.महेंद्र खोंडे प्रा. दिलवर सिंग गिरासे यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थित महिलांना आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ज्ञानेश्वर भामरे व दिलीप पाटील यांनी महिलांच्या हक्काची जाणीव व सहकार क्षेत्रात बचतगट चे योगदानाबद्दल माहिती करून दिली
तसेच तुळजाभवानी. भीम गर्जना. रमाई. जय भीम. संतोषीमाता. ओम शांती. दत्तकृपा. जय मल्हार .म्हाळसा माता. जोगेश्वरी रिया .जय कालिका. आम्रपाली जिजाई. जय भवानी. या महिला गटाच्या अध्यक्षांना कर्तुत्ववान महिला बचत गट पुरस्कार २०२३ सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस चव्हाण यांनी केले आभार ज्ञानेश्वर भामरे यांनी मानले






