दिघंची येथील जि.प. प्राथमिक शाळा नं.१ करण्यात चे दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्ज्याचे – अजित रणदिवे
दिघंची ता. आटपाडी जि.सांगली येथील दिघंची जि.प. प्राथमिक शाळा नं.१ दुरुस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्ज्याचे केले आहे. शाळा दुरुस्तीचे काम इस्टीमेट नुसार दुरुस्ती झालेले नाही व यासाठी वापरण्यात आलेले साहित्य/माल इस्टीमेट नुसार वापरले गेले नाही. या संधर्भात दि १५/०२/२०२३ रोजी गटविकास अधिकारी यांना सदर कामाची चौकशी व संबधीत कामाची चौकशी होत नाही तो पर्यंत कोणत्याही प्रकारचे बिल देऊ नये असे निवेदन दिले होते.
परंतु आज पर्यंत सदरच्या शाळा दुरुस्तीच्या कामाची कोणतीही चौकशी केली गेली नाही. आम्ही देलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही.तरी आम्ही दि. १०/०४/२०२३ रोजी आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषणास बसणार आहे.असा इशारा अजित रणदिवे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिनांक २४ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे







