अर्थे येथील चिराईदेवी बहुउद्देशीय सेवा
भावी संस्थेला महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागीय पुरस्कार प्रदान
तऱ्हाडी:-अर्थे तालुका शिरपूर येथील चिराई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने धुळे जिल्ह्यात महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दिनांक २८ मार्च रोजी पुणे येथील हॉटेल लेमन ट्री येथे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व महिला बालविकास विभागाचे आयुक्त विमला मॅडम यांच्या हस्ते सन २०१६/१७ या वर्षातील महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल अर्थे येथील चिराईदेवी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेला महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागीय पुरस्कार संस्थेचे सचिव मनोहर पाटील व अर्थे येथील लोकनियुक्त सरपंच मनीषा मनोहर पाटील यांना सन्मानपत्र; ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले ही संस्था २०१० पासून महिला व बालकल्याण विभागासाठी कार्य करत असून संस्थेनेबालकामगार .महिला राज्य आयोग .नाबार्ड मार्फत महिला बचत गट. केंद्र शासन पुरस्कृत महिला प्रशिक्षण. बालकांसाठी विविध योजना लाभार्थी पर्यंत पोहोचण्याचे कार्य या संस्थेमार्फत चालत असते म्हणून महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागीय पुरस्कार देऊन या संस्थेला सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व संचालक मंडळ उपस्थित होते पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्थे सह परिसरातील नागरिकांनी संस्थेचे कौतुक केले
फोटो:- अर्थे येथील चिराईदेवी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेला पुणे येथे महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना संस्थेचे सचिव मनोहर पाटील अर्थे येथील लोकनियुक्त सरपंच मनीषा मनोहर पाटील व मान्यवर







