शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी संतोष ढेंमरे यांना अटक
आटपाडी तालुक्यातील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी फरार असलेला संतोष धोंडीराम ढेमरे वय वर्ष 40 याला सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आटपाडी येथे व्ही. एच. एस. ट्रेडर्स आणि एल. एल. पी. या कंपनीच्या भागीदाराने आटपाडी परिसरामध्ये नागरिकांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.
ठेवीदार लोकांकडून रोख स्वरूपात ठेव रक्कम स्वीकारली होती या गुंतवणुकी दारांना कंपनीने चेक व ठेव पावत्या दिल्या होत्या. परंतु कंपनीने ठेवीदारांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना कोणत्याही ठेव पावतीचा परतावा न देता 1 कोटी 27 लाख रुपयाची फसवणूक केली होती
याबाबत 28 फेब्रुवारी रोजी संतोष धोंडीराम ढेंमरे, संदीप धोंडीराम ढेंमरे, विनोद दादासो कदम व हरून इस्माईल तांबोळी राहणार आटपाडी यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील हे करीत आहेत या पुण्यातील मुख्य संशयित संतोष धोंडीराम ढेंम रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र फरार असलेले ढेंमरे यांचा शोध सुरू होता
तो पुणे येथे बिबवेवाडी येथे असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस हवालदार अमोल लोहार, इरफान पखाली, उदय घाडगे, पोलीस नाईक विनोद कदम, दीपक रणखांबे ,कुलदीप कांबळे, दिपाली पाटील यांनी संतोष ढेमरे यांना अटक केली.
व्ही एच एस ट्रेडर्स आणि एल एल पी या कंपनीच्या भागीदारांनी शेअर मार्केट मधून अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय विश्रामबाग सांगली यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सुधीर पाटील यांनी केले आहे







