त-हाडी येथे ११व १२ एप्रिल रोजी सती वानू माता देवीचा यात्रा उत्सव
त-हाडी – शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसराचे ग्राम आराध्य दैवत आई सतीवानू माता मंदिराची यात्रोस्तव दि ११ व १२ एप्रिल या दोन दिवशी होणार आहे
मागील तीन वर्षांपासून कोरोनाच्या उद्रेकामुळे यात्रा उत्सव हा बंद ठेवण्यात आला होता ह्या वर्षी मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यामुळे यात्रा भरविण्यात येत आहे.
ब-हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर शिरपूर तालुक्या पासून गावापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले त-हाडी गाव आहे.या ठिकाणी दोन दिवस मोठया दिमाखात यात्रा भरणार आहे. दि ११ शांताराम चव्हाण यांचा व १२रोजी शालिग्राम व शांताराम यांचा तमाशा होणार आहे यात्रेसाठी नाशिक ,जळगाव ,धुळे ,नंदुरबार मालेगाव गुजरात, मध्ये प्रदेश तसेच पर राज्याहून भाविक येत असतात. यात्रा निमित्ताने आई सती वानु माता मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.तसेच यात्रेसाठी हॉटेल, पाळने, संसारूपयोगी वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.
मंदिरात प्रवेश केल्यावर. मन प्रसन्न होते ही यात्रा चैत्र शुद्ध पंचमी दिवशी भरत असते.यात्रेनिमित्त गावातून दोन दिवस तगतरावाची मिरवणुक काढण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी सती वानु माता यात्रा उत्सव समिती त-हाडी यांच्या कडुन व दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ या़च्या. कडून तगतराची मिरवणूक काढण्यात येते अनेक भाविक सहपत्नीक नवस देखील फेडण्यासाठी येत असतात. यात्रेसाठी सती वानु माता यात्रा उत्सव समिती,त-हाडी ग्रामस्थ व तरुण वर्ग सहकार्य करीत असतात दोन दिवस तऱ्हाडी सह परिसरातील भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे पुजारी संतोष भामरे यांनी केले आहे







