आटपाडी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ शेटफळे येथे दोन ठिकाणी शेती साहित्य चोरून नेले तर आटपाडी येथून मोटरसायकल पळवली
आटपाडी तालुक्यांमध्ये सध्या चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे दिनांक 21 एप्रिल रोजी संध्याकाळी शेटफळे येथील शेतकरी सतीश गायकवाड यांच्या शेतामधून शेडनेट कागद 416 किलो साधारणपणे किंमत 40000 रुपये प्लास्टिक पाण्याची टाकी एक ग्रास कटर मशीन व बागेसाठी लागणारे लिक्विड असा 58 हजार रुपये चा मुद्देमाल पळवून नेला आहे
तर दुसऱ्या घटनेमध्ये शेटफळे येथील शेतकरी भारत माने यांची शेताला पाणी देण्यासाठी ओढ्यावरती लावलेली इलेक्ट्रिक मोटर चोरट्यांनी पळून नेली आहे
तर तिसऱ्या घटनेमध्ये आवळा येथील राजेंद्र हेगडे यांची मोटरसायकल आटपाडी ओढ्यावर असलेल्या पुलाजवळून पळवून नेली आहे या तिन्ही घटनांची आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे याबाबत आटपाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत







