फुले शाहू आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त-हाडी येथे भव्य भीम गींताचे आयोजन
त-हाडी:- ,फुले शाहू आंबेडकर यांची जयंती एक आगळावेगळा पद्धतीने साजरी करण्याची त-हाडी येथील तरुणांनी ठरवले व फुले शाहू आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १मे २३, महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त रोजी सायंकाळी ठीक साडेसहा वाजता मा. प्रबोधन,व ज्ञानसंपन्न आविष्कार टिव्ही स्टार प्रचारक प्रा डॉ पंडित घनश्याम थोरात बुद्ध चालवत राजेंद्र थोरात यांचे वादळी परिवर्तनाचे भव्य भीम गींताचा कार्यक्रम आयोजित केले आहे.
महापुरुषांच्या जयंत्या ह्या डीजे च्या तालावर नाचून नाही तर महापुरुषांचे विचार वाचून साजऱ्या व्हायला हव्यात ही कल्पना डोक्यात घेऊन प्रा डॉ पंडित घनश्याम थोरात, यांच्या भव्य भीम गींताचा आयोजन त-हाडी येथील तरुणांनी केले आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या भीम गींताचा लाभ घ्यावा अशी विनंती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती,आयोजक कमिटी कडून करण्यात आली आहे.







