त-हाडी परिसरातील अवकाळी पाऊस वादळाचं
तांडव !अवकाळी पाऊसाचा त-हाडी वरूळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे गावांना फटका मका भुईमूग, उन्हाळी पिकांचं प्रचंड नुकसान!
कष्टाने आलेलं पीक निसर्गाने क्षणात घालवलं…
त-हाडी परिसरातील अवकाळी पाऊस वादळाचं
तांडव !
अवकाळी पाऊसाचा त-हाडी वरूळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे गावांना फटका मका भुईमूग, उन्हाळी पिकांचं प्रचंड नुकसान!
■ जवखेडा महसूल मंडळातील त-हाडी वरुळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे अभानपुर जळोदसह अन्य भागात ,वादळी वाऱ्यामुळे घर,गोठे व इमारतीवरील टिनपत्रे उडाली.
■ शेतातील मका भुईमूग,ज्वारीसह फळबाग पिकांचे प्रचंड नुकसान तर घरातील कापूस भिजला.

■ त-हाडकसबे येथे गोठ्यात बांधलेले जनावरे दाबले गेले
■ वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली तर विद्युत रोहित्र खांब ही झाले आडवे.
■ काही तास विज पुरवठा खंडीत.
▪️ अनेक लग्न समारंभ आयोजकांची तारांबळ
त-हाडी- प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील त-हाडीसह व जवखेडा महसूल मंडळात काल (ता.२९) रोजी संध्याकाळच्या सुमारास तुफान वादळी वारा,अवकाळी पाऊसाने उन्हाळी मका, भुईमूग कांदासह फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,तर घरावरील टिन पत्रे उडाल्याने घरातील साठवलेल्या कापूस पिकांसह संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विजांच्या कडकडाटात सोसाट्याचा वारा सोबत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने क्षणभरातच शेतातील पिकांसाठी निवासी घरांचे नुकसान होऊन जानवरे दाबले गेले पक्षांचाही मृत्यू झाला आहे.दरम्यान विद्युत रोहित्र,खांब व तारांवर अनेक भागांमध्ये झाड पडल्याने विज पुरवठा खंडीत झाला आहे.

परिसरातील सोसाट्याचा वादळी वारा,विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊसामुळे अनेक भागातील मोठी झाडे उलमळून पडली. इलेक्ट्रीक पोल पडले,शेतातील मका भुईमूग व ज्वारी आडवी पडून काही ठिकाणी उडून गेली तर काही ठिकाणी वाहून गेले,घरावरील व गोठयातील
टिनपत्रे उडाल्याने कापुस, कांदा, साठवून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
शिरपूर तालुक्यातील त-हाडी व जवखेडा महसूल , वरुळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे अभानपुर जळोद अन्य भागात ,वादळी वाऱ्यामुळे सर्वाधिक नुकसान पाहायला मिळते.काल घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण महसूल विभागाने लवकरच पंचनामे करावे नुकसानेचे .त-हाडी (ता.२९) एप्रिल रोजी सायंकाळच्या ५ वाजता दरम्यान वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मध्ये उडाल्यामुळे धुवाधार अवकाळी पाऊस कोसळल्याने परिसरात एकच धावपळ उडाली.
गेल्या आठवड्यापासून तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर दिसून येत असून बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या समस्या ही उद्भवल्या आहेत. परिसरातील या अवकाळी पाऊस व विजांमुळे शेतकऱ्यांसह इतर नागरिकांचेही नुकसान होत आहे.काल झालेल्या धुवाधार पाऊस व वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाचा कडाका सहन करून कष्टाने पिकविलेले पीक निसर्गाने क्षणात घालवल्याची प्रतिक्रिया बाधित शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.
त-हाडी फोटो :
त-हाडकसबे : वादळी पाऊसामुळे येथील घरावरील तीन पत्रे उडून संपूर्ण संसार उघड्यावर आले.
त-हाडी – अवकाळी पावसामुळे भुईमूग झाले नुकसान







