झरे महाविद्यालयाचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत घवघवीत यश
कु. वासंती पारेकर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम
महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे. पद्मभूषण डॉ.क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय,झरे या महाविद्यालयाची बी. ए. भाग 2 ची विद्यार्थिनी कु.वासंती महादेव पारेकर हिने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,वाघोली, पुणे. शिवजयंती निमित्ताने इतिहास विभागातील इतिहास संशोधन मंडळाअंतर्गत “जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज “या विषयावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली होती.
तिला या निबंध लेखनासाठी प्रा. सौ. आर.व्ही.काळेल यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन,मा.आर. एस. चोपडे, व्हा.चेअरमन श्रीमती, एल.टी. शेंडगे, सचिव,एस. ए. पाटील, खजिनदार, एस. व्ही. अनुसे,तसेच संचालक,पी. बी. स्वामी, संचालक, ए. एस. पडळकर,ज्येष्ठ सल्लागार, एस.के. कदम, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, आर.एच. पाटील तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.







