सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व, युवकांच्या गळ्यातील ताईत मा. श्री. अध्यक्ष तानाजीराव पाटील _ डॉ. विजयकुमार पाटील
अध्यक्ष तानाजीराव पाटील यांना वाढदिवसाच्या हर्दिक हार्दिक शुभेच्छा
आटपाडी तालुक्यातील ग्रामीण दुष्काळी भागातील सर्वसामान्य विद्यार्थी हा वेगवेगळ्या शाखेतून शिकला पाहिजे.
मानदेशातील विद्यार्थ्यांना त्याच भागात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘विद्या विनयेन शोभते’ या देहाने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगोत्री मानदेशी भूमीत पसरवली आहे.
आज समाजातील आदर्श लुप्त होत आहेत सारेच दीप मंदावत आहेत. अशावेळी माणसांच्या हातात प्रेम क्षमता या आदर्श गुणाची ज्योत प्रज्वलित होईल का असा प्रश्न पडतो.
खऱ्या अर्थाने चोहीकडे पाहिल्यास सर्व क्षेत्रात आपल्या मूल्यवान आयुष्य खर्च केलेले अनेक जण सापडतात. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात मोठी परंपरा असून त्यांचा बाईक होण्याच्या प्रयत्न अनेक जण गुरुजनांनी केलेला आढळतो. त्यामध्ये शिवछत्रपतींच्या विचार वारसातून महात्मा ज्योतिराम फुले, राजश्री शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाला ज्ञान गंगेच्या पवित्र जलाने पवित्र केलेले आहे
आटपाडी सारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यात जन्मलेले मानदेशी भूमीची प्रतिष्ठा वाढवणारे मराठी भाषेचे आधुनिक वाल्मिकी काय ग दि माडगूळकर थोर साहित्यिक शंकरराव खरात व व्यंकटेश माडगूळकर हे या मानवी चे भूषण आहेत. त्यांचाच वारसा श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी चालवला आहे.
आटपाडी मध्ये श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या छताखाली कला विज्ञान महाविद्यालयाची स्थापना 2001 मध्ये करण्यात आली त्यानंतर श्रीराम ज्युनिअर कॉलेज श्री तानाजीराव पाटील शिक्षण शास्त्र महाविद्यालय आटपाडी ,शिवाजी पॉलिटिक कॉलेज आटपाडी, युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल आटपाडी ,याबरोबर शिक्षण घेण्यासाठी इच्छा असूनही जे शिक्षणापासून वंचित आहेत अशा सर्वांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे अभ्यास केंद्र ,कला व विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2013 मध्ये सुरू केलेले आहे, या केंद्रामार्फत बी. ए .एम. ए. मराठी, हिंदी, इंग्रजी ,अर्थशास्त्र ,लोकप्रशासन या विषयातून पदवी तर शिक्षण घेण्याची सोय केलेली आहे .ही सर्व महाविद्यालय व शाळा ही विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असून त्यापैकी एक श्रीराम एज्युकेशन कॉलेज आटपाडी या कॉलेजला फेब्रुवारी 2023 पासून अंशतः अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे. या सर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून श्रीराम भाऊ उद्देशीय सेवाभावी संस्थेने कमी कालावधीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात उतुंग प्रगती केलेली आहे.
त्यामुळे संस्थेच्या स्थापनेपासून आज अखेर संस्थेच्या अनेक महाविद्यालयांमध्ये या शाळेतील विद्यार्थी संख्येचा उल्लेख उंचावत आहे या उंचावत जाणाऱ्या उल्लेख हा बरोबर विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम प्रशस्त व्यायामशाळा प्रशस्त क्रीडांगण पोलीस व सैन्य भरतीसाठी अकॅडमी सुरू केलेल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सांस्कृतिक बौद्धिक क्षेत्रांमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे त्यामुळे संस्थेच्या कॉलेजमधील अनेक विद्यार्थी बोर्डाच्या व विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत काही विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाचे गुणवत्ता शिष्यवृत्ती हिंदी शिष्यवृत्ती मिळालेली आहे. तर काही विद्यार्थी लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात व महाराष्ट्र राज्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत .
तसेच काही विद्यार्थी विद्यार्थिनी आय.टी.आय मध्ये निवड झालेली आहे आणि श्रीराम बहु उद्देशिय सेवाभावी संस्थेच्या सर्व महाविद्यालयाच्या व शाळेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे.
या शैक्षणिक कार्याबरोबर मा. श्री. तानाजीराव पाटील यांनी सामाजिक कार्यात अश्या प्रकारचे कार्य केलेले आहे .कारण कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या स्वतःच्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर तालुक्यांमध्ये अनेक विकास कामे केलेली आहेत .सामान्य माणसांचा विश्वास आपल्या कामाच्या माध्यमातून सर्व सार्थ ठरवून आटपाडी तालुक्याचा विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून रात्र आणि दिवस सर्व सामान्य माणसासाठी उपलब्ध असतात.
आटपाडी तालुक्यातील युवकांना आपल्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श समोर ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांनी फक्त जनतेच्या विकास कामालाच प्राधान्य दिलेले आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले तेव्हापासून आटपाडीच्या विकासाला सुरुवात केली असे म्हणता येईल. आटपाडी तालुक्यातील रस्ते वीज जलसंधारण पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजनेतून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
याचबरोबर सांगली जिल्हा बँकेचे ऐतिहासिक निवडणुकीमध्ये विजय मिळवून संचालक झाले तर नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवले आहे.
भविष्यामध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी आमदार व्हावे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
सर्वसाधारण लोकांच्यात मिसळणारा लोकप्रिय नेता अध्यक्ष तानाजीराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा







