ज्वारीचे उत्पादन वाढले मात्र भाव कोसळले
तूर वगळता इतर पिकांना योग्य भाव नाही.
त-हाडी:-
त-हाडी परिसरातील जमीन सुपीक असल्याने शेतकरी वर्षभरात विविध प्रकारची पिके घेत असतात. परंतु विविध पिकांपैकी एखाद्याच पिकाला योग्य भाव मिळतो. उर्वरित पिके कवडीमोल भावात विकण्याची वेळ नेहमी शेतकऱ्यांवर येते. गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळतच नाही, मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी पैशाची गुंतवणूक करून कांदा पीकविला, परंतु शेवटी कांद्यानेच शेतकऱ्यांचा वांदा केला.
शेतकऱ्यांच्या काद्याला घाऊक बाजारात सरासरी फक्त ५ रुपये किलो ने मागणी करण्यात येते, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला, शेतकऱ्यांनवर अनेक प्रकारचे संकटे चालूच राहतात, वरून नापिकी, तर खाली पिकांना भाव नाही, अशा आसमानी व सुलतानी दोन्ही प्रकारच्या संकटांशी शेतकऱ्यांना मुकाबला करावा लागतो. तरीही शासन जशी पाहिजे तशी आर्थिक मदत शेतकऱ्यांना करत नाही. थोड्याफार मदतीने शेतकऱ्यांना फक्त दिलासा मिळतो, अनेक संकटाचा सामना करून शेतकरी खंबीरपणे दुसरे पीक काढण्यास तयार राहतो. आज नाही तर उद्या चांगले पीक मिळनार, चांगला भाव येणार अशी आस व जिद्द मनासी बाळगून शेतकरी राबत राहतो. तरीही मात्र चागले भाव मिळत नाही, सध्या आलेल्या ज्वारी या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र त-हाडी परिसरात दिसून येत आहे,
ज्वारी पीक हे विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात मांडले शेवटी पोत्यात भरून आपल्या घरी ठेवण्यास सुरुवात करत असल्याचे दिसून येत आहे, अनेक शेतकऱ्यांना वाटते हे आपले पीक विकून पिकासाठी लागलेला खर्च काढू, इतरांना उधारीचे पैसे देऊन टाकू, पण मात्र होते उलटच. योग्य भाव मिळत नाही शेतकरी पुन्हा, पुन्हा चिंतेत सापडतो, शेतकऱ्यांच्या मेहनतीने पीकविलेल्या पिकांना योग्य तो भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे.
प्रतिक्रिया
आवक वाढल्यामुळे ज्वारीच्या दरात घसरण झाली आहे. यावर्षी तूर वगळता सर्वच पिकांच्या भावांमध्ये घसरण झाली आहे.
चिंतामण धनगर, व्यापारी त-हाडी







