तऱ्हाडी येथे अंगणवाडीतील सॅम व मॅम विद्यार्थी शोध मोहीम सुरू
तऱ्हाडी:-महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात ०ते ६ वयोगटातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी सॅम व मॅम विद्यार्थी शोध मोहीम २जून ते १५जून दरम्यान करावयाची आहे तरी तऱ्हाडी येथील आरोग्य सेविका व आरोग्य सेविक अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्ती यांनी तऱ्हाडी ममाणे व अभाणपूर येथील अंगणवाडी येथील ०ते६वर्ष वयोगटातील बालकांची वजन उंची व दंडगोल तपासणी करण्यात येत आहे तरी तऱ्हाडी अंगणवाडी क्रमांक १मध्ये सॅम बालक २ व मॅम बालक २ तऱ्हाडी अंगणवाडी क्रमांक २ मध्ये सॅम बालक १व मॅम बालक ३तऱ्हाडी अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये सॅम बालक २व मॅम बालक ० व ममाणे अंगणवाडी क्रमांक १ मध्ये सॅम बालक १व मॅम बालक २ व ममाणे अंगणवाडी क्रमांक २मध्ये कुपोषित १ व अशी बालक तपासणी अंती अहवाल समोर आला आहे
हा अहवाल महीला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कडे पाठविण्यात आला असून ह्या अति तीव्र कुपोषित अति कुपोषित बालकांची वाढ होण्यासाठी इ डी एन एफ या पोषण आहार दिला जातो तरीही तऱ्हाडी व ममाणे अंगणवाडी येथील ०ते०६ वयोगटातील बालकांची तपासणी अंती अती तीव्र कुपोषित सहा व अतिकुपोषित सहा बालक आढळून आले आहेत तरी हे प्रमाण कमी करणे बाबत आरोग्य सेविक व अंगणवाडी सेविका या़नी काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी अंगणवाडी सेविका योगीता भामरे. परीचारीका योगीता बडगुजर .आरोग्य सेविक रविंद्र शिरसाठ. आशा कार्यकर्ती मालती इंदवे .मदतनीस कोकीळा भामरे हे परीश्रम घेत आहेत







