यंदा चटकदार लोणच्याला महागाईची झळ; गृहिणींची लोणचे तयार करण्यासाठी लगबग
,
लोणच्याचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटतेच. मग ते लिंबाचे असो, की आंब्याचे. पहिला पाऊस पडला, की लोणचे बनवण्याची तयारी सुरू होते.
गावरान कैरीची जागा आता कलमी आंब्याच्या कैरींना मान्सूनपूर्व पावसाच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात कैरी गळून पडली आहे. यामुळे लोणच्याची कैरी दुरापस्त होऊन आवक अजूनही बाजारात मंदावलेली आहे. कधीकाळी परिसरात गावरान आंबा उत्पादनात अग्रेसर होता.
या भागात मोठ्मोठ्या आमराईने नटलेले वैभव दिसून येत होते. मात्र कालांतराने डेरेदार आम्रवृक्षांच्या सावटाखाली शेतीपिकांचे उत्पादन कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याची जुनी झाडावर कुऱ्हाड घातली गेली. परिणामी परिसरात आमराई पडद्याआड झाल्या आणि यामुळे ग्रामीण भागातील घराघरात आंब्याचा घमघमाट दुरावला गेला. आजमितीस बोटावर मोजण्याइतकेच शेतकऱ्यांकडे गावरान आंब्याची झाडे दिसून येत आहेत. वातावरणीय बदल तसेच अवकाळीमुळे बहुतांश आंब्याच्या मोहरांवर परिणाम झाला होता, यामुळे यंदा गावरान आंब्याची गोड चव आबंट होणार असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
गृहिणींकडून लोणचे तयार करण्याची लगबग सुरू झाली असून लोणच्यासाठी लागणारी गावरान कैरीची जागा आता कलमी आंब्याच्या कैरींना दिली आहे. लोणचे तयार करण्यासाठी लागणारा गरम मसालाही तेजीत असल्याने लोणचे तयार करण्यासाठी खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
ग्रामीण भागात व शेतकरी कुटुबांत आजही लोणच्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. घरात पंचपक्वानांचे स्वादिष्ट भोजन असले तरीही लोणच्याशिवाय या सुग्रास भोजनाला स्वाद येत नाही. यामुळे घरोघरी लोणचे घातले जाते.
: – सुनंदा साहेबराव वानखेडे, गृहिणी
पुर्वी या परिसरात आंब्या झाडांची मोठी आमराई होती. कालांतराने रोगराईने तर बहुतांश आंब्याचे डेरेदार झाडे तोडल्यामुळे गावरान आंबे कमी झाले आणि घराघरातील आंब्याचा घमघमाट दुरापस्त झाला. : – गायत्री धनराज खोंडे ममाणे, गृहिणी
एक किलो कैरीमागे कापण्याचे दहा रूपये दर आकारले जातात.
खास गावरान कैरींची मागणी असल्याने, चांगल्या कैऱ्या मिळाव्यात म्हणून महिलांची सकाळीच गर्दी होते. आम्ही लगेच कैऱ्या कापूनही देतो. म्हणून गिऱ्हाईकही इतर कुठे जात नाही.
- : वासुदेव भोई, तोरखेडा आंबे विक्रेते व कारागीर
संग्रहित छायाचित्र – आंब्याच्या लोणच







